मेष राशीच्या व्यक्तींनी करावी ‘या’ देवतेची उपासना; होतात सर्व मनोकामना पूर्ण
जोतिष शास्त्रात राशींना विशेष स्थान प्राप्त आहे. ज्योतिष शास्त्रात एकूण 12 राशी आहेत ज्या 27 नक्षत्रांमध्ये विभाजित केल्या जातात. जन्म नक्षत्रानुसार प्रत्येक व्यक्तीची एक रास असते.व्यक्तीच्या राशीनुसार त्याचा स्वभाव, गुण तसेच राशीचा ग्रह स्वामी सांगितला जातो. या व्यतिरिक्त प्रत्येक राशीचा एक इष्ट देव देखील असतो. इष्ट देव व्यक्तीची जन्म कुंडली आणि राशीनुसार सांगितला जातो. आज आम्ही तुम्हाला मेष राशीच्या व्यक्तींचा इष्ट देव कोणता आहे आणि त्यांनी त्या देवाची कशी आराधना करावी याबाबत सांगणार आहोत.
ज्योतिष शास्त्रातील 12 राशींपैकी पहिली मेष रास मानली जाते. या राशीचा स्वामी ग्रह मंगळ आहे. यामुळे या राशीच्या व्यक्तींवर मंगळ ग्रहाचा अधिक प्रभाव यला मिळतो. या व्यक्तींमध्ये मंगळ ग्रहाप्रमाणे उत्साह दिसून येतो. मेष राशीचे व्यक्ती वेगवान, आशावादी आणि आत्मकेंद्रित असतात तसेच ते निर्भय आणि धैर्यवान देखील असतात.
मेष राशीच्या व्यक्तींचा इष्ट देव
मेष राशीचा स्वामी ग्रह मंगळ असल्यामुळे या व्यक्तींनी नेहमी श्री गणेश आणि श्री हनुमानांची अधिक भक्ती करावी.
प्रत्येक मंगळवारी श्री गणेश किंवा हनुमान मंदिरात जावे. यावेळी लाल फुल आणि प्रसाद म्हणून बुंदीचा लाडू देखील घेऊन जावा.
दररोज श्री गणेश अर्थवशीर्ष आणि हनुमान चालिसा वाचावी. यामुळे या दोन्ही देवता नेहमी तुमच्यावर प्रसन्न राहितील.
मंगळवारी लाल रंगाचे वस्त्र धारण करावे.
मंगळवारी मांसाहार, मद्यपान करु नये. या दिवशी केवळ सात्विक आहार घ्यावा.