ताज्या बातम्यामहाराष्ट्र

तीन गावठी कट्टे, पाच जिवंत काडतुसासह तिघांना अटक


नाशिक : शहर पोलिसांनी शहरात एकच दिवशी गंगापुर, सरकारवाडा ,अंबड पोलिस ठाण्याच्या हद्दीत कारवाई करीत तीन वेगवेगळ्या ठिकाणी सापळे रचुन तीन देशी कट्ट्यांसह तिघांना अटक केली असून त्यांच्याकदुन ५ जिवंत काडतुसही जप्त करण्यात आले आहे. नाशिक शहर पोलिसांच्या दरोडा व शस्त्रविरोधी पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे कारवाई करीत सोमवारी (दि. २४) दिवसभरात वेगवेगळ्या पोलीस ठाणेचे हद्दीत सापळे लावुन ३ गावठी पिस्टल ०५ जिवंत काडतुस हस्तगत केले आहे. यात सरकारवाडा पोलीस ठाणे हद्दीत नासरेथ नगर, शरणपुर रोड येथुन प्रविण विजय त्रिभुवन( २६ , रा. त्रिमुर्ती चौक, कांकरीया सुपर मार्केट शेजारी, सिडको) याला ताब्यात घेवुन त्याचेकडुन १ गावठी पिस्टल व १ जिवंत काडतुस हस्तगत केले. तर गंगापुर पोलीस ठाणे हद्दीत विद्याविकास सर्कलजवळ, प्रसाद सर्कल नाना-नानी पार्क, गंगापुर रोड, नाशिक येथुन जयपाल संजय गायकवाड ,(२४, रा. के.बी.टी. सर्कल, मधुबंधन सोसायटी गंगापुर रोड) याला ताब्यात घेवुन त्याचेकडुन १ गावठी पिस्टल व २ जिवंत काडतुस हस्तगत करण्यात आले. तिसरी कारवाई यात अंबड पोलीस ठाणे हद्दीत करण्यात आली.

औदुंबर कॉर्नर, शाहुनगर, दत्त मंदीराच्यसा भिंतीलगत, सिडको, अंबड, येथुन अक्षय आनंदा सैंदाणे (२६, रा. दत्त चौक, सरखती चौक, सिडको) याला ताब्यात घेवुन त्याचेकडुन १ गावठी पिस्टल व २ जिवंत काडतुस हस्तगत करण्यात आले. या तीनही आरोपीतांविरोधात गंगापुर, सरकारवाडा व अंबड पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या कारवाईत शस्त्र विरोधी पथकाचे प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक के. टी. रोंदळे व पोलीस अंमलदार पोलीस हवालदार वियजकुमार सुर्यवंशी, पोलीस नाईक मोहन देशमुख, पोलीस अंमलदार महेश खांडबहाले, प्रविण चव्हाण, युवराज गायकवाड, सागर बोधले, तेजस मते, संदीप डावरे, भरत राउत यांनी संयुक्तरित्या कामगिरी करीत महत्वाची भूमिका बजावली.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button