एका छोट्या कीटकाने उद्ध्वस्त केले माणसाचे आयुष्य, कापावे लागले हात पाय
एक छोटासा कीटकही माणसाला हॉस्पिटलमध्ये नेऊ शकतो. अशीच एक घटना टेक्सासमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीसोबत घडली आहे. त्याला एक कीटकाने चावला होता, त्याचा हा चावा इतका भयानक होता, की त्यामुळे त्या व्यक्तीला रुग्णालयात दाखल करावे लागले, इतकेच नाही तर त्यामुळे त्याचे हात पायदेखील कापावे लागले. आपल्या आजूबाजूला अनेक जीवजंतु आहेत. वेगवेगळे प्रकारचे सरपटणारे तसेच उडणारे किडे, मुंग्या, झुरळ आपण सर्रास पाहतो. पण जगात असे देखील कीटक आहेत, की ते चावल्यास थेट हॉस्पिटलमध्ये घेऊन जातात. असे प्राणघातक किडे जंगली भागांमध्ये पपाहायला मिळतात, परंतु बरेच वेळा हे किडे उडून मानवी वस्तीपर्यंत पोहोचतात आणि नंतर रोग पसरवण्यास सुरवात करतात. कीटकांच्या चाव्याव्दारे एखाद्याचा जीव धोक्यात येण्याची घटना अत्यंत दुर्मिळ असली तरी, अमेरिकेतील टेक्सासमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीसोबत असेच काहीसे घडले आहे.
त्या व्यक्तीला एका छोट्या किटकाने चावा घेतला होता, पण हा चावा त्या व्यक्तीसाठी खूपच भयानक ठरला. किटकाच्या चाव्यामुळे त्याला गंभीर आजार झाला आणि नंतर त्याचे हात पाय कापून शरीरापासून वेगळे करावे लागले.
उपचारावर झाला लाखो कोटींचा खर्च
त्या दुर्दैवी व्यक्तीचे मायकेल कोहलहॉफ असे आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्याला टायफस नावाचा आजार आहे आणि हा आजार एका लहान परजीवी किडीच्या चाव्याव्दारे माणसांमध्ये पसरतो. समस्या अशी आहे की हा आजार लवकर बरा होत नाही आणि लाखो, करोडो रुपये त्याच्या उपचारावर खर्च होतात. आता जरी या आजारावर उपचार केले जात असले तरी शतकांपूर्वी यावर कोणताही इलाज नव्हता. असे म्हटले जाते की 1812 मध्ये अनेक फ्रेंच सैनिकांना हा आजार झाला होता आणि उपचाराअभावी त्यांना आपला जीव गमवावा लागला होता.
जीव वाचवण्यासाठी कापावे लागले हात पाय
रिपोर्ट्सनुसार, मायकेलला सेप्टिक शॉकमुळे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. बरेच दिवस त्याच्यावर उपचार झाले, डॉक्टरांनी औषधे दिली, पण नंतर त्याचे हात पाय हळूहळू वितळू लागले. अशा परिस्थितीत डॉक्टरांना त्याचे हात पाय कापावे लागले, जेणेकरून त्याचा जीव वाचू शकेल. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की त्याच्या उपचारावर सुमारे 52 लाख रुपये खर्च झाले आहेत. त्याच्या कुटुंबाकडे तेवढे पैसे नसल्याने अशा परिस्थितीत त्यांनी निधीच्या माध्यमातून एवढा पैसा उभा केला आणि मायकलवर उपचार केले.