मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन की निरोपाचे भाषण?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नुकतीच सहकुटुंब भेट घेतली. यानंतर पंतप्रधानांनी ट्विट करून याची माहिती देत मुख्यमंत्र्यांचे कौतुक केले. याबद्दल उत्पादन शुल्कमंत्री शंभुराज देसाई यांनी विधान परिषदेत मुख्यमंत्र्यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडत महाराष्ट्रासाठी ही गोष्ट अभिमानास्पद असल्याचे सांगितले.
असा प्रकार पहिल्यांदाच घडल्याने ‘हे मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन होते की निरोप समारंभाचे भाषण’ अशी जोरदार चर्चा सुरू होती.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्ली येथे सहकुटुंब भेट घेतली. ही भेट कौटुंबिक स्वरूपाची भेट होती असे सांगत महाराष्ट्राच्या विकासकामांबाबतही चर्चा झाल्याची माहिती भेटीनंतर खुद्द मुख्यमंत्र्यांनी दिली होती. या भेटीबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पह्टोसह ट्विट केले आहे. ‘महाराष्ट्राचे गतिशील आणि कष्टाळू मुख्यमंत्री असल्याचे सांगत त्यांच्या कुटुंबांना भेटून आनंद झाला. महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी त्यांची तळमळ आणि विनम्र स्वभाव काwतुकास्पद आहे.’ असे या ट्विटमध्ये त्यांनी म्हटले आहे. यावर शंभुराज देसाई यांनी मांडलेल्या अभिनंदनाच्या ठरावात, पंतप्रधानांकडून मुख्यमंत्र्यांचे केलेले काwतुक म्हणजे महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद गोष्ट असल्याचे सांगत गौरवपर ठरावच मांडला. यावर राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांनी चांगलाच टोला लगावला. अशाप्रकारे मुख्यमंत्र्यांच्या अभिनंदनाचा ठराव म्हणजे पहिल्यांदाच घडलेली घटना आहे. हा ठराव म्हणजे ‘मुख्यमंत्र्यांच्या निरोप समारंभाचे भाषण होते का’ असा खोचक सवालही त्यांनी केला.