उत्तर द्यायला तयार, पण विरोधकच गैरहजर; कृषीमंत्री मुंडे संतापले
मुंबई:राज्याचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनाच्या सातव्या दिवशी विधान परिषदेत कृषीमंत्री धनंजय मुंडे विरोधकांवर संतापल्याचं पाहायला मिळालं. मंत्री सभागृहात उपस्थितीत असताना विरोधी पक्षनेते आणि आमदार उपस्थितीत नसल्याने धनंजय मुंडे यांनी नाराजी व्यक्त केली.
धनंजय मुंडे म्हणाले, फक्त टीका करायला विरोधक उपस्थित राहतात, पण सरकार उत्तर द्यायला उपस्थितीत राहिलं की विरोधी बाकावर एक सदस्य सोडून कोणीही उपस्थितीत नसतं. यासारख दुसरं दुर्दैव नाही. मी अनेक वर्षे या सभागृहाचा सदस्य राहिलो. पण हे चित्र मी कधीच पाहिले नाही. मी देखील विरोधी पक्ष म्हणून या सदनात काम केलय.
विरोधीपक्ष वेगवेगळी आयुध वापरुन सरकारला प्रश्न विचारतो. विरोधकांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर द्यायला सरकार आज उभं आहे. पण उपस्थित प्रश्नांवर सरकारचे उत्तर ऐकायला या सदनात विरोधी पक्ष नाही, हे उभ्या महाराष्ट्राला कळायला पाहिजे, असंही मुंडे म्हणाले.
सत्तापक्ष जेवढा संवेदनशील असतो त्यापेक्षा जास्त संवेदनशील विरोधकांनी असावं लागतं. विरोधकांनी फक्त टीका करायची म्हणून केलीये. पण यावर नेमकं उत्तर द्यायचे कोणाला असा प्रश्न पडला होता. पण उशीरा का होईन विरोधी पक्षनेते आले त्या बद्दल त्यांचे आभार मानतो, अस मुंडे यांनी म्हटलं.
शेतकऱ्यांना १ रुपयांत पीक विमा देण्याचा निर्णय सरकारने घेतला. १ कोटी ११ लाख शेतकऱ्यांनी पिक विम्याचा फायदा घेतलाय. ६५७ कोटी गेल्या सरकारमध्ये शेतकऱ्याने पिकविम्याकरता प्रिमियम भरला. आता या सरकारने हे पैसे स्वतः भरले. विरोधक बोलले तर तो १ रुपयाही सरकार भरायला तयार आहे, असंही धनंजय मुंडे यांनी नमूद केलं.