आई-बाबांचा निरोप घेऊन मुलं शाळेत तर गेली, पण घरी आल्यावर समोरचं दृश्य पाहिल्यावर ते हादरलेच.
दारूचे व्यसन अतिशय वाईट. त्यामुळे फक्त शरीर आणि आरोग्यावरच नव्हे तर संपूर्ण कुटुंबावर विपरीत परिणाम होतो. हे माहीत असूनही लोक दारू पिणं काही सोडत नाहीत. त्यामुळे अनेक वाद होतात आणि कुटुंबही उध्वस्त होतात.
असंच एक प्रकरण नुकतंच घडल आहे, जेथे दारूमुळे झालेला वाद एवढा पेटला की त्या इसमाने पत्नीसह स्वत:लाही (husband killed wife) संपवले आणि मुलं क्षणात पोरकी झाली.
संपूर्ण बिहारमध्ये दारूबंदी असली तरी हीच दारू अद्यापही घरगुती वादास कारणीभूत ठरली आहे. हे प्रकरण कटिहार येथील आहे. तेथील धर्मेली गावात राहणारा धर्मेंद्र कुमार नेहमी दारू प्यायचा, ज्यावरून त्याचे त्याच्या पत्नीशी नेहमी भांडण होत असे. घटनेच्या दिवशीही धर्मेंद्र कुमार व पत्नीचा वाद झाला, मात्र ते भांडण इतकं वाढलं की संतापलेल्या धर्मेंद्र कुमारने प्रथम पत्नीची हत्या केली आणि नंतर घरातून पळून जाऊन स्वत:ही आत्महत्या केली. त्या दोघांना दोन मुलंही आहेत, मात्र तेव्हा ती शाळेत गेल्याने वाचली. पण ती क्षणात पोरकी झाली. हे ऐकून गावातील सर्वच लोक सुन्न झाले.
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि तपास सुरी केला. प्राथमिक तपासानुसार घरगुती वादामुळे ही हत्या झाल्याचे दिसत आहे, असे पोलिसांनी सांगितले. दोन्ही मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आले आहेत.
या घटनेतील सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे एकीकडे बिहारमध्ये संपूर्ण दारूबंदीचा दावा केला जात असला तरी आता दुर्गम भागातही दारू सहज उपलब्ध होत आहे. दारूमुळे घरगुती वादाचे आकडे पुन्हा वाढले आहेत.