“राऊत हिजाब घालून पळून जाऊ शकतो! लुक आऊट नोटीस जारी करा”
मुंबई : खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजीत पाटकर त्यांच्यासोबत डॉ. किशोर बिचुले यांना ईडीने अटक केली. मुंबई महापालिकेतील कोव्हिड घोटाळ्याप्रकरणी ईडीने कारवाई केली आहे. ईडीतर्फे १९ जुलैच्या रात्री उशीरा अटक करण्यात आली आहे.राऊतांचे निकटवर्तीय मानले जाणाऱ्या पाटकर यांच्यावर कोविड काळात कंत्राट घोटाळा केल्याचा आरोप आहे. निविदा नसतानाही साहित्य खरेदी केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. यावरुन भाजपा आमदार नितेश राणे यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे.
राणे म्हणाले की, ‘सुजीत पाटकर हा संजय राऊत यांचा पार्टनर आहे. संजय राऊत हा चोर आहे. संजय राऊत यांचा पैसा सुजीत पाटकर सांभाळतो. संजय राऊत जास्त दिवस बाहेर राहणार नाही. कैदी नंबर 8969 असेल. संजय राजाराम राऊत याने तयारी करावी.केंद्र सरकारवर रोज आरोप करायचे.संजय राऊत देश सोडून जाऊ शकतात. त्यामुळे लूक आऊट नोटीस काढली पाहिजे. संजय राऊत हिजाब घालून पळून जाऊ शकतो.’ असं नितेश राणे यांनी म्हटलं आहे.