ताज्या बातम्यामहाराष्ट्र

सासवड शहर फेरीवाला समितीच्या सदस्यपदी गुलाबराव सोनवणे


सासवड शहर फेरीवाला समितीच्या सदस्यपदी गुलाबराव सोनवणे

सासवड शहर फेरीवाला समिती बिनविरोध, एक जागा रिक्त,

सासवड : सासवड शहर फेरीवाला समिती निवडणूक २०२३ ते २०२८ या कालावधीसाठी सासवड नगरपरिषदेच्या वतीने निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता, त्याप्रमाणे ७ जुलै २०२३ रोजी , निवडणूक निर्णय अधिकारी स्मिता साबळे , यांनी निकाल जाहीर जाहीर केला, यामध्ये गुलाबराव भाऊसाहेब सोनवणे यांची बिनविरोध निवड झाल्याचे घोषीत करण्यात आले,.

गुलाबराव सोनवणे हे कोडीत गावचे रहिवासी असून, गेले अनेक वर्षे ते सासवड नगरपालिका क्षेत्रात पथारी कामगार म्हणून काम करीत आहेत, त्यांची फेरीवाला समितीच्या सदस्यपदी बिनविरोध निवड झाल्याने त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन व स्वागत करण्यात येत आहे, पुरंदर तालुका राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे तालुकाध्यक्ष म्हणून त्यांनी यापूर्वी प्रभावीपणे काम केले आहे. तसेच श्रीनाथ म्हस्कोबा महाराज देवस्थान ट्रस्ट श्रीक्षेत्र कोडीत या ट्रस्टचे पाच वर्षे विश्वस्त म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. २०२३ मध्ये , राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने त्यांना खासदार शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, यांच्या उपस्थितीत , पुरंदर हवेलीचे लोकप्रतिनिधी आमदार संजय जगताप यांच्या शुभहस्ते व संतश्रेष्ठ संत रोहिदास महाराज जयंतीदिनी आदर्श समाजभूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले होते, त्यामुळे त्यांच्या रुपाने सामाजिक क्षेत्राशी नाळ असलेल्या व सामाजिक बांधिलकी जपणार्या व्यक्तीला सासवड शहर फेरीवाला समितीच्या सदस्यपदी काम करण्याची संधी मिळाल्याने त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे,

सासवड नगरपरिषद शहर फेरीवाला समितीच्या ८ सदस्यांपैकी ७ सदस्यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा, घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी, स्मिता साबळे यांनी जाहीर केले, यावेळी सासवड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी निखिल मोरे, सहायक प्रकल्प अधिकारी जस्मिन मधाळे, सासवड नगरपरिषदेतील सर्व विभाग प्रमुख, जाणीव हाकर्स संघटनेचे संजय शंके यांनी नवनिर्वाचित सदस्यांना मार्गदर्शन करुन त्यांचे अभिनंदन केले,

निवडीनंतर सर्व नवनिर्वाचित सदस्यांचे आमदार संजय जगताप यांनी स्वागत करुन त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या,

बिनविरोध निवड झालेले सदस्य प्रवर्गनिहाय पुढील प्रमाणे,

१ ) गुलाबराव भाऊसाहेब सोनवणे ,- अनुसूचित जाती, २ ) हरुन हसनभाई बागवान – इतर मागासवर्गीय ३ ) शकील सिकंदरभाई बागवान – विकलांग ४ ) शरद गजानन पाडसे – सर्वसाधारण ५ ) कालीदास बाबूराव पापळ – सर्वसाधारण ६ ) शमशाद अकबर फकीर, – अल्पसंख्याक महिला राखीव, ७ ) सुनिता हनुमंत पवार – सर्वसाधारण महिला राखीव, या प्रमाणे हे सर्व सदस्य बिनविरोध निवडून आले, व १ जागा अनुसूचित जमाती महिला ही जागा रिक्त राहीली आहे ,असे निवडणूक निर्णय अधिकारी स्मिता साबळे यांनी सांगितले,

यांच्यासह ७ सदस्य बिनविरोध निवड झाल्याचे घोषीत करण्यात आले,


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button