राज्य पोलीस दलातील वीस एसीपींच्या बदल्या
मुंबई: राज्य पोलीस दलातील २० सहाय्यक पोलीस आयुक्तांच्या सोमवारी अंतर्गत बदली करण्यात आली आहे. त्यात शीना बोरा हत्येचा पर्दाफाश करणाऱ्या दिनेश कदम यांची खंडाळा पोलीस प्रशिक्षण केंद्रातून पुण्याच्या गुन्हे अन्वेषण विभागात बदली झाली आहे.
अन्य पोलीस अधिकाऱ्यांमध्ये दिनेश मनोहर कटके यांची ठाणे शहर, सुधाकर सुराडकर व भागवत सुपडू सोनावणे यांची मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, शालिनी शर्मा यांची नागपूर, संजय शामराव पवार यांची कळंब-उपविभागीय पोलीस अधिकारी, नितीनकुमार निळकंठ गोकावे यांची अहमदनगर मुख्यालय, शेखर बसवेश्वर डोंबे यांची ठाणे, संध्या बुवाजी गावडे यांची सावंतवाडी उपविभागीय पोलीस अधिकारी, गौरीप्रसाद चंद्रशेखर हिरेमठ यांची भू उपविभागीय पोलीस अधिकारी, दिनेश परशुराम कदम यांची पुणे गुन्हे अन्वेषण विभाग, सुशीलकुमार काशिबाराव नायक यांची नांदेड उपविभागीय पोलीस अधिकारी, सचिंद्र भाऊराव शिंदे यांची अमरावती उपविभागीय पोलीस अधिकारी, अजयकुमार मालविय यांची बुलढाणा उपविभागीय पोलीस अधिकारी, विजय धोंडीबा भिसे, प्रकाश वसंत बेले यांची मुंबई, मृदृला रोहित दिघे ठाणे उपविभागीय पोलीस अधिकारी, हेमंत नरहरी शिंदे यांची नागपूर, योगेश नथुराम मोरे यांची पुणे, निलेश विश्वासराव देशमुख यांची तुळजापूर उपविभागीय पोलीस अधिकारी आणि संजय रतन बांबळे यांची नाशिक उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.