ताज्या बातम्यामहाराष्ट्र

कोथिंबीरीला अच्छे दिन, चांगला भाव मिळत असल्यामुळे शेतकरी आनंदी


महाराष्ट्र : मागच्या काही दिवसांपासून पालेभाज्यांचे दर  चांगलेचं वाढले असल्यामुळे शेतकर वर्ग आनंदात आहे. बाजारात भाजीपाला कमी प्रमाणात येत असल्यामुळे भाजीपाल्यांचे दर अधिक वाढले आहेत.टोमॅटोचे दर देशात मोठ्या शहरात दीडशे ते दोनशे रुपयांच्या दरम्यान आहेत. त्यामुळे केंद्र सरकार महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातून टोमॅटो खरेदी करुन कमी दरात विकत आहे. कालपासून बाजारात कोंथिबीरला (Good day to coriander) सुध्दा चांगला भाव मिळत आहे. त्यामुळे शेतकरीवर्ग अधिक आनंदात दिसत आहे. लातूरमधील एका शेतकऱ्याने कोथिंबीरच्या पिकातून दोन लाख रुपये कमावले आहेत.



कोथिंबीर पिकाला दोन लाख रुपयांचा भाव

बाजारात कोथंबीरीला चांगला भाव मिळत असल्याने शेतकरी आनंदी आहेत. लातूर जिल्ह्यातल्या कोराळी येथील शेतकऱ्याने एका एकरात दोन लाख रुपयांच्या कोथिंबीरीचे उत्पादन घेतले आहे. त्यामुळे त्या शेतकऱ्यांची अधिक चर्चा सुरु आहे. तीन महिन्याच्या कोथिंबीर पिकाला दोन लाख रुपयांचा भाव मिळाल्याने शेतकऱ्यांचा कल आता कोथंबीर लागवडीकडे वळला आहे. कोराळी येथील शेतकरी संजय बिरादार यांना कोथंबीर लागवडीसाठी ३५ हजार रुपये खर्च आला होता. त्यांना आता एकराला दोन लाख रुपयांचा भाव मिळाला आहे.

कच्च्या टोमॅटोला धोका निर्माण झाला

टोमॅटो उत्पादनात लाखो रुपयांची उलाढाल करणाऱ्या लातूर जिल्ह्यातल्या वडवळ-जाणवळ भागातील शेतकरी नव्या संकटात सापडले आहेत. टोमॅटो पिकावर बोकड्या-किडीने आक्रमण केले आहे. त्यामुळे पाने आणि कच्च्या टोमॅटोला धोका निर्माण झाला आहे.त्यामुळे कृषी अधिकाऱ्यांच्या सल्ल्याने पुढील गोष्टी होणार आहेत.

खरीप हंगामात नगदी पीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हळदीच्या दरात मागील काही दिवसात वाढ झाली आहे. रिसोड बाजार समितीत काल हळदीला विक्रमी असे 13 हजार 500 रुपये प्रति क्विंटलपर्यंत दर मिळाला. हळद 14 हजार उंबरठ्यावर पोहचले असल्याने हळद उत्पादन शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. हळदीच्या मागणीत दिवसेंदिवस वाढ होत असून तुलनेत पुरवठा कमी होत आहे. येत्या काही दिवसांत हळदीचे दर 14 हजार रुपयांचा टप्पा ओलांडण्याची शक्यता आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button