ताज्या बातम्यामहाराष्ट्र

श्रावणातील व्रतवैकल्य 17 ऑगस्टपासून करावी


पुणे:आषाढ महिना संपल्यानंतर श्रावण महिन्याला सुरूवात होते. अनेक जणांकडून या महिन्यात व्रतवैकल्ये, देवदर्शन केले जाते. श्रावण महिन्याला आजमंगळवारपासून सुरूवात होत आहे  त्यामुळे अनेक जण व्रत वैकल्ये करण्याची शक्यत आहे, तसेच श्रावण महिन्यातील 8 सोमवार येत असल्यामुळे अनेकांमध्ये संभ्रम आहे. मात्र श्रावणातील व्रतवैकल्य 17 ऑगस्ट ते 15 सप्टेंबर दरम्यान करावी असे आवाहन पंचांगकर्ते मोहन दाते यांनी म्हटले आहे.
यंदा अधिक असल्याने श्रावण महिन्यास सुरुवात होणार आहे. यंदा दोन श्रावण मास असल्याने श्रावण महिन्यात केले जाणारे व्रतवैकल्य कधी करायचे? श्रावण सोमवारचे उपवास नेमके कधी करायचे? असे प्रश्‍न सध्या उपस्थित होत आहेत. मात्र हे सगळे व्रत, उपवास 17 ऑगस्ट ते 15 सप्टेंबर 2023 या कालावधीत करावे, अधिक मासात करु नयेत. असे पंचांगकर्ते मोहन दाते यांनी स्पष्ट केले. दर तीन वर्षांत एकदा कोणता तरी महिना अधिकमास येतो. दर 19 वर्षांनी पुन्हा तोच महिना अधिकमास येतो, असा एक साधारण नियम आहे. यंदाच्या वर्षी श्रावण महिना अधिक आला आहे. त्यामुळे काही लोकांच्या मनात आठ श्रावण सोमवार असल्याच्या शंका उपस्थित होत आहेत. यापूर्वी 2004 मध्ये अधिक श्रावण महिना आला होता. यावर्षी श्रावण अधिक असल्याने श्रावण मासात केली जाणारी सर्व वार व्रते नीज मासात म्हणजेच 17 ऑगस्ट ते 15 सप्टेंबर 2023 या कालावधीत करावे, अधिक मासात करु नयेत, असे पंचांगकर्ते मोहन दाते यांनी स्पष्ट केले. तसेच अधिक महिन्यामुळे गणपतीचे आगमन हे जवळपास 19 ते 20 दिवस उशिराने होणार आहे. अर्थात 19 सप्टेंबरला गणरायचे आगमन होणार आहे. अधिक श्रावण महिन्यांमध्ये विष्णूच्या पित्यर्थ दानधर्म, जप, पूजा, अनुष्टान, याग इत्यादी गोष्टी करायच्या आहेत. लग्न, मुंज, वास्तुशांत इत्यादी गोष्टी या अधिक महिन्यात करता येणार नाहीत. पण व्यावहारिक गोष्टी आहेत जसे साखरपुडा, बारसा या गोष्टी या अधिक महिन्यांमध्ये देखील करता येतील, अशी माहिती देखील पंचांगकर्ते मोहन दाते यांनी दिली आहे.



श्रावणाचे केवळ चार सोमवार असणार – अधिक श्रावण महिना 18 जुलै ते 16 ऑगस्टपर्यंत असून त्यानंतर 17 ऑगस्ट ते 15 सप्टेंबरपर्यंत नीज श्रावण मास असणार आहे. श्रावण महिन्यातील सर्व व्रते, सोमवारचे उपवास, मंगळागौर पूजन आदी याच नीज श्रावण (शुद्ध) महिन्यात करावे. त्यामुळे महाराष्ट्रात श्रावणाचे आठ सोमवार नाहीत. केवळ चार श्रावण सोमवार असतील, अशी माहिती पंचागकर्ते मोहन दाते यांनी दिली.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button