श्रावणात तुळशीच्या बाबतीत चुकूनही करू नका ‘या’ गोष्टी अन्यथा.
अधिक श्रावणाची आजपासून सुरूवात झाली आहे. अधिक श्रावण आणि निज श्रावण असा मिळून ५९ दिवसांचा यंदाचा श्रावण असणार आहे. हा श्रावण १८ जुलै २०२३ रोजी सुरू झाला असून हा श्रावण १५ सप्टेंबर २०२३ पर्यंत चालणार आहे.अधिक श्रावणात काही गोष्टी करण्यास मनाई असते. त्या गोष्टी कोणत्या आहेत हे आपण जाणून घेऊया.
श्रावणात कोणत्या गोष्टी करणं टाळावं?
श्रावणात धार्मिक मान्यतेनुसार संध्याकाळी तुळशीच्या रोपाची पूजा करत असल्यास तुळशीच्या रोपाला आपला स्पर्श होणार नाही याची काळजी घ्या.असं केल्यास माता लक्ष्मी तुमच्यावर क्रोधित होऊ शकते.
तुळशीची पानं तोडत असल्यास त्याला नखं लावू नका. अनामिका आणि अंगठा यांच्या सहाय्याने तुळशीची पानं तोडावी. तुळशीला त्रास न देता काळजीपूर्वक ही पानं तोडावीत.
धार्मिक शास्त्रांमध्ये असे सांगितले आहे की, जेव्हा तुम्ही तुळशीची पूजा कराल तेव्हा त्यानंतर तुळशीभोवती किमान तीन परिक्रमा करा. तुळशीची पूजा केल्यानंतर अनेकजण तुळशीची परिक्रमा करत नाहीत, याकडे विशेष लक्ष दिले गेले पाहिजे.
पुरुषोत्तम महिन्यात भगवान विष्णू योगनिद्रामध्ये राहत असले तरी या काळात त्यांची उपासना केल्यास विशेष फल प्राप्त होते. रविवारी आणि एकादशीला तुळशीला जल अर्पण करू नये, असे म्हटले जाते, या काळात तुळशीच्या रोपात माता लक्ष्मी निर्जला व्रत करत असते. त्यामुळे या दिवशी तुळशीच्या रोपांना पाणी दिल्यास माता लक्ष्मीचा कोप तुमच्यावर होऊ शकतो.