अमित शहा ‘त्यांना’ जोड्यासमोरही उभे करत नाही, शिवसेना नेत्याची जहरी टीका
मुंबई: केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री शासन आपल्या दारी हा कार्यक्रम घेऊन लोकांपर्यंत जात आहेत. शासकीय अधिकारी काम करत आहे. याचा जनतेला लाभ होत आहे.
op राज्यात त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे विरोधी पक्षाच्या पोटात गोळा उठला आहे. माणसे आणावी लागतात असे विरोधी पक्षाचे नेते म्हणतात. पण, मुख्यमंत्री शिंदे यांच्या सभेला कुणाला आणावं लागत नाही माणसे स्वतः हुन येतात. सर्व पक्षाचे कार्यकर्ते येतात. जनतेत संभ्रम पसरविण्याचे काम उबाठा गट करत आहे अशी टीका शिवसेना (शिंदे गट) नेत्याने केली आहे.
राज्यात एकीकडे 205 आणि विरोधी पक्षाचे किती असे चित्र आहे. नरेंद्र मोदी यांच्याकडे पाहून सगळे आकर्षित होत आहेत. ‘कमिशन, खोके’ हे मुंबई महापालिकेत गेल्या 25 वर्षांपासून सुरू आहे. आता त्यांना ते मिळणे बंद झालं आहे. निवडणूकीच्या दृष्टीने जे सर्व्ह सुरू आहेत त्यात उबाठा गटाच्या एका नेत्याने 13 पैकी 3 आमदार निवडून येतील असे सांगितले आहे. त्यामुळे या भीतीने सरकारची बदनामी करण्याचरे उद्योग सुरु आहेत पदाधिकारी नाही, लोक प्रतिनिधी नाही, कार्यकर्ते नाहीत म्हणून ही टीका सुरु आहे असा आरोप शिंदे गटाचे प्रवक्ते किरण पावसकर यांनी केला.