ताज्या बातम्यामहाराष्ट्रराजकीय

अजित पवारांकडे अर्थ खातं सोपवल्यानंतर देवेंद्र फडणवीसांचं दोनच शब्दांचं ट्वीट, म्हणाले.


जुलै रोजी अजित पवार यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. तसंच राष्ट्रवादीच्या एकूण नऊ मंत्र्यांचा शपथविधीही त्याच दिवशी पार पडला. आधी  शिंदे गट शिवसेनेतून वेगळा झाला आणि त्यानंतर वर्षभराने अजित पवारांनी सत्तेत येण्याचा निर्णय घेतला.
आज दुपारी खातेवाटप करण्यात आलं. त्यात अजित पवारांना अर्थ खातं देण्यात आलं. या खाते वाटपानंतर देवेंद्र फडणवीस यांनी फक्त दोन शब्दांचं ट्वीट केलं आहे.

काय आहे देवेंद्र फडणवीस यांचं ट्वीट

डेस्क क्लिअर्ड असा मेसेज देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. ट्वीटरवर काही सह्या करतानाचे फोटो त्यांनी ट्वीट केले आहेत. देवेंद्र फडणवीस यांचं हे ट्वीट चर्चेत आहे. कारण अजित पवारांकडे अर्थखात्याची धुरा दिल्यानंतर अवघ्या दोन शब्दांचं हे ट्वीट आहे. इतके दिवस हे खातं देवेंद्र फडणवीस यांच्याकडे होतं.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाला नऊ मंत्रिपदं मिळाली आहेत.

अजित पवार यांच्याकडे अर्थ खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे. अजित पवार हे महाविकास आघाडीत अर्थमंत्री होते. एकनाथ शिंदे यांनी बंड केलं त्यानंतर जेव्हा ते बाहेर पडले तेव्हा त्यांनी अजित पवारांवरही टीका केली होती. अजित पवार यांनी निधी वाटपात पक्षपातीपणा केला होता. शिवसेनेच्या आमदारांना निधी वाटताना दुजाभाव केल्याचं म्हटलं होतं. अशात आता अर्थखातं हे अजित पवारांकडेच आलं आहे.

अर्थ खातं- अजित पवारांकडे अर्थ खातं देण्यात आलं आहे. हे खातं आधी भाजपाकडे होतं आणि देवेंद्र फडणवीस हे अर्थमंत्री होते. मात्र आता अजित पवार अर्थमंत्री असतील.

कृषी खातं- हे खातं नव्या खातेवाटपात धनंजय मुंडेंना देण्यात आलं आहे. ते आधी शिवसेनेच्या अब्दुल सत्तार यांच्याकडे होतं.

भाजपाच्या अतुल सावे यांच्याकडे असलेलं सहकार खातं आता राष्ट्रवादीच्या दिलीप वळसे पाटील यांना देण्यात आलं आहे.

भाजपाच्या रविंद्र चव्हाण यांच्याकडे असलेलं अन्न आणि नागरी पुरवठा खातं हे छगन भुजबळांना देण्यात आलं आहे.

शिवसेनेच्या संजय राठोड यांच्याकडे असलेलं अन्न आणि औषध प्रशासन खातं हे राष्ट्रवादीच्या धर्मराव बाबा अत्राम यांना देण्यात आलं आहे.

भाजपाच्या गिरीश महाजन यांच्याकडे असलेलं क्रीडा आणि युवक कल्याण खातं हे संजय बनसोडेंना देण्यात आलं आहे.

भाजपाच्या मंगलप्रभात लोढांकडे असलेलं महिला आणि बालकल्याण खातं हे राष्ट्रवादीच्या आदिती तटकरेंना देण्यात आलं आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे असलेलं मदत आणि पुनर्वसन खातं हे राष्ट्रवादीच्या अनिल पाटील यांना दिलं गेलं आहे. नव्या खातेवाटपाचा विचार केला तर हे लक्षात येतं की राष्ट्रवादीला जी खाती मिळाली आहेत त्यात भाजपाकडे असलेली सहा खाती आणि शिवसेनेकडे असलेल्या तीन खात्यांचा समावेश आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button