‘अजित पवार गट युतीत आल्यावर नाराजी होणारच..मंत्रीपदं आहेत;साधीसुधी गोष्ट नाही’ – बच्चू कडू
मुंबई:अजित पवारांसह 9 मंत्र्यांच्या शपथविधीपासून सत्ताधारी शिवसेनेतील इच्छुक नेत्यांचे मंत्रिमंडळ विस्ताराकडे लक्ष लागले आहे. पहिल्या टप्प्यात ज्यांना संधी मिळाली नाही, त्यांना दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात संधी मिळण्याची शक्यता आहे अशात भाजपकडून पडद्यामागून अजित पवार यांच्याशी सुरु असलेल्या वाटाघाटी आणि मुख्यमंत्री बदलण्याच्या हालचाली या बातम्यांमुळे एकनाथ शिंदे हे नाराज झाल्याचे सांगितले जाते.
या सर्व मुद्द्यावर आमदार बच्चू कडू यांची माध्यमांशी बोलतांना शक्यता वर्तवली आहे की,’अजित पवार गट युतीत आल्यावर नाराजी होणारच. ही मंत्रीपदं आहेत. साधीसुधी गोष्ट नाही. कोण कशावरून नाराज होईल सांगता येत नाही. आपल्याच पद मिळावं ही प्रत्येकाची अपेक्षा असते. कोणीच आनंदी नसतो. विरोधी पक्षातील लोकही आनंदी नसतात आणि सत्ताधारीही नसतो. सुखी माणसाचा सदरा वगैरे असं आलं नाही अजून, असं बच्चू कडू म्हणाले.
दरम्यान, राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या जोरदार हालचाली सुरू आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यात मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चांवर चर्चा सुरू आहेत.