कोणाच्या गळ्यात पडणार मंत्रिपदाची माळ? अखेर नावे आली समोर, शिंदे गटाची ‘ही’ नावं फिक्स
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी भाजप सरकारमध्ये सामील होत सर्वांना धक्का दिला. यामुळे त्यांच्या 9 आमदारांना मंत्रिपद देण्यात आले. आता पुन्हा एकदा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. यामुळे अनेकांनी फिल्डिंग लावली आहे.
आता या मंत्रिमंडळ विस्ताराकडे लक्ष लागून राहिला आहे. कोकणातून उदय सामंत, दीपक केसरकर यांच्यानंतर आदिती तटकरे यांना संधी देण्यात आली आहे. मात्र मंत्रिपदाची इच्छा यापूर्वीच व्यक्त केलेले शिवसेनेचे महाडचे जेष्ठ आमदार भरत गोगावले यांचा अद्याप मंत्रिमंडळात समावेश करण्यात आलेला नाही.
यामुळे आता त्यांना संधी दिली जाणार आहे. येत्या एक दोन दिवसात हा मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे. यामध्ये मंत्रिमंडळाच्या विस्तारात भरत गोगावले यांचे नाव निश्चित झाले आहे.
गोगावले यांना मंत्रिमंडळ स्थान मिळाल्यास कोकणात उदय सामंत, आदिती तटकरे व दीपक केसरकर अशी चार मंत्रीपदे वाट्याला येतील. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, डॉ बालाजी किणीकर, संजय शिरसाट, भरत गोगावले यांचा समावेश होणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. अजित पवार यांच्याकडे अर्थ खाते देण्यास शिवसेना व भाजप या दोघांचाही विरोध आहे.
त्यामुळे त्यांच्याकडे महसूल खाते देण्यात येईल अशी सूत्रांची माहिती आहे. शिंदे गटाचे मंत्री अब्दुल सत्तार, डॉ तानाजी सावंत आणि संदीपान भुमरे यांना मंत्रिमंडळातून वगळण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे.