शिंदे सरकारच्या उर्वरित मंत्रिमंडळ विस्तारासाठी पावसाळी अधिवेशन लांबणीवर
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी आपल्या काका शरद पवार यांच्याविरोधात जात काही आमदारांच्या पाठिंब्याने शिवसेना-भाजप सरकारशी हातमिळवणी केली. यानंतर राज्यातील घडामोडींना प्रचंड वेग आला आहे.तसंच अजित पवार यांच्या सरकारमध्ये सहभागी झाल्याने शिंदे गटात अस्वस्थता असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चांना वेग आला आहे. यामुळे विधानसभेचं पावसाळी अधिवेशन मात्र लांबणीवर पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आज होणाऱ्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेतला जाणार आहे.
नियोजित पावसाळी अधिवेश हे १७ जुलै रोजी होणार होतं. मात्र, याज दुपारी होणाऱ्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत हे नियोजित पावसाळी अधिवेशन पुढे ढकलण्यात येणार आहे. आजच्या बैठकीत चर्चेनंतर अधिवेशनाची पुढील तारिख ठरवली जाणार आहे. शिंदे सरकारच्या उर्वरित मंत्रिमंडळचा विस्तार त्यानंतर विधीमंडळाचे सुरु असलेली कामे यामुळे हे अधिवेश पुढे ढलकलेले जाणार आहे. आज होणाऱ्या बैठकीत सर्वपक्षित नेत्यांच्या चर्चेतून पुढील निर्णय घेण्यात येणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार शिंदे सरकारच्या पुढच्या मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख जवळपास निश्चित झाल्याचे सांगितले जात आहे. येत्या ९ किंवा १० जुलै रोजी शिंदे सरकारचा उर्तवरीत मंत्रिमंडळ विस्तार पार पडणार असल्याचं सांगितलं जात आहे. मंत्रिमंडळ विस्तारात शपथ घेणाऱ्या मंत्र्यांना संबंधित खात्यांची माहिती असावी या अनुषंगाने घडामोडींना वेग आला आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी नंदनवन या शासकिय निवास्थानी पार पडलेल्या बैठकीत उर्वरित मंत्रिमंडळाचा विस्तार तसंच भाजप आणि शिवसेनेच्याच आमदारांचा शपथविधी होणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.