भाज्यांचे भाव गगनाला, तरी शेतकऱ्यांच्या खिशात जात नाही पैसा; असं का?
मुंबई: शहरात तर भाज्यांचे भाव गगनाला भिडले आहेतच पण आता ग्रामीण भागातही भाज्यांचे दर महाग झाले आहेत. काही ठिकाणी पाऊस नसल्याने तर काही ठिकाणी अवकाळी पावसानं पिकांचं अतोनात नुकसान झालं आहे.त्यामुळे भाजीपाल बाजारात येत नाही. भुसावळमध्ये विभागात पावसाने पाठ फिरवल्याने भाजीपाल्याचे उत्पादन कमी होत आहे. सोबतच खरिप हंगामासाठी शेतकऱ्यांनी भाजीपाला लागवड केलेली नाही. यामुळे बाजारातील आवक कमी होऊन भाजीपाल्याचे दर वाढले आहेत.
गेल्या पंधरवड्यात ४० रुपये किलोवर असलेले टोमॅटो आता १०० रुपये, तर मिरचीचे दर दुपटीने वाढून 100 रुपयांवर पोहोचले आहेत. भाजीपाल्याची ही दरवाढ प्रामुख्याने गेल्या पंधरवड्यात झाली आहे. केवळ टोमॅटो, हिरवी मिरचीच नव्हे तर मेथी, भेंडी, पालक, पोकळा, शेपू या पालेभाज्यांचे दर 100 ते 110 रुपये किलोदरम्यान आहेत. कोथिंबीर 240 तर उन्हाळ्यात 200 रुपये किलोवर पोहोचलेले लिंबाचे दर आता केवळ 20 रुपये आहेत
दरवाढ झाल्याने अनेक विक्रेत्यांनी देखील कमी प्रमाणात भाजीपाला विक्रीसाठी ठेवला आहे. पावसानंतर दर कमी होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. दरवर्षी पावसाळ्याच्या पहिल्या टप्यात आवक कमी झाल्याने भाजीपाल्याचे दर वाढतात. पण, ही स्थिती जास्त दिवस राहत नाही.
दुसरीकडे एपीएमसी बाजारात सध्या पावसामुळे लसणाची आवक कमी होत असून त्यामुळे दर वधारत आहेत गुजरात,मध्य प्रदेश हिमाचल मधून लसणाची आवक होत आहेत.मात्र आवक कमी झाल्याने दिवसेंदिवस दरात वाढ होताना दिसत आहे. सध्या घाऊक बाजारात प्रतिकिलो उटी लसूण 200 रुपये व देशी लसूण 150 रुपये आणि किरकोळ बाजारात 200 ते 250 रुपयांवर पोहचला आहे. जानेवारी- फेब्रुवारीमध्ये नवीन लसणाची आवक होण्यास सुरुवात होते.सुरुवातीला लसणाचे दर आवाक्यात असल्याने समाधान व्यक्त करण्यात येत होते.परंतु एप्रिलपासून आवक कमी झाल्याने भाव वधारण्यास सुरुवात झाली आहे. मार्च महिन्यात किरकोळ बाजारात लसूण 50 तर 80 रुपये इतके होते.
एप्रिल महिन्यापासून लसणाच्या दरात सातत्याने वाढ होताना दिसत आहे.सध्या घाऊक बाजारातच लसूण दिडशे रुपयांवर गेले असून,उटी लसूण 200 रुपये व देशी लसूण 150 रुपयांनी विक्री होत आहे, तर किरकोळ दर 200 रुपयांवर गेला आहे.पुढील काही दिवसात दर वाढणार असल्याचे व्यापारी सांगत आहेत. एमएसपी समितीचे सदस्य विनोद आनंद यांच्या मते, भाज्यांच्या दरवाढीचा फायदा शेतकऱ्यांना मिळत नाही. देशाच्या सर्व भागातून महागड्या भाज्या शहरांमध्ये येतात. एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीमध्ये ते म्हणतात की भाज्या विकून होणारा फायदा हा मधला एजन्ट किंवा व्यापारी यांना होतो.
प्रत्यक्षात शेतकऱ्याला मात्र पैसे कमीच मिळत आहेत. भाज्यांचे दर वाढले तरी शेतकऱ्यांना कोणताही फायदा होत नाही. देशातील सर्वच भागात मध्यस्थांची कमाई वाढत आहे. यासोबतच व्यावसायिकांचीही कमाई होत आहे. व्यापारी शेतकऱ्याकडून अगदी किरकोळ दरात 20 ते 30 रुपयात शेतमाल उचलतात आणि तोच शहरांमध्ये दीडशे रुपयांना विकत आहेत.