ताज्या बातम्यामहाराष्ट्र

आखाडामुळे गावरान कोंबड्याचे भाव ‘गगनाला’


आषाढी एकादशी नंतर श्रावणमासारंभा पर्यंत खेडोपाड्यात घरोघरी आखाड पार्ट्यांचे आयोजन मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे.
आषाढाच्या उत्तरार्धातील मंगळवार आणि शुक्रवार हा देवाला कोंबडं, बकरे कापून नवस फेडण्याची परंपरा अनेक भागात आहे. त्यामुळे गावरान कोंबड्यांचे भाव गगनाला भिडले आहेत.

यावर्षी मान्सून पाऊस पडत नसल्याने, शेतातील कामे खोळंबली आहेत. अशातच, आषाढात खवय्ये चमचमीत मांसाहारी भोजन मित्र मंडळींसोबत खाण्याची मौज लुटत आहेत. पावसाळा सुरू असल्याने माशांचा विणीचा हंगाम असतो. या दिवसात मासे कमी प्रमाणात मिळतात. आखाड पार्टीचा बेत काहीसा खास असावा अन्‌ त्यासोबतीला रसरशीत गावरान कोंबड्याचा ताव असावा, असे नियोजन असणाऱ्यांनी बाजारात तसेच आजूबाजूच्या खेडेगावात फेरफटका मारायला सुरुवात केली असून “गावरान कोंबडा’ सगळ्यांच्या पसंतीला उतरत आहे.

आषाढ पार्टीसाठी खवय्यांची पहिली पसंती गावरान कोंबड्याच असतो. तो ही लाल तुरा, बाक देणाराच असावा. त्यामुळे या दिवसात गावरान कोंबड्यांचे भाव गगनाला भिडले आहेत. एरव्ही 500 ते 550 रुपयांत मिळणारी कोंबडा श्रावण सुरू होण्यापूर्वीच्या आठवड्यात कोंबडी बाजारात 650 रुपयांपर्यंत पुढेच मिळत होता. या दिवसात गावरान कोंबडी सोबतच वनराज कोंबडा देखील चांगलाच भाव खाऊन जात आहेत. गुरुवार (दि. 6) चतुर्थी तसेच पुढील गुरुवार (दि. 13) एकादशी असल्याने, इतर दिवशी मांसाहर खवय्यांचे दिवस आहेत.

घरगुती पदार्थांच्या मेजवानीचे बेत
पूर्वी ग्रामीण भागात या काळात बोकड किंवा बकरे वाट्यावर लावला जायचा; मात्र आता लहान मुले बकऱ्याचे मटण खाण्यास नकार देतात आणि बकऱ्याच्या मटनाचे दर ही वाढले आहेत. गावरान कोंबड्याची तुपातील बिऱ्याणी, सुप, गावराण मसाला, रसरशीत रस्सा आणि स्पेशल कोंबडी वडे, चुलीवरची भाकरी या घरगुती पदार्थांच्या मेजवानीचे बेत आखले जाऊ लागले आहे.

आज रोजीचे किलोचे दर रुपांत
बकऱ्याचे मटण : 720
बॉयलर चिकन : 240
लेअर चिकन : 180
गावरान कोंबडा : 650
गावरान कोंबडी : 400
वनराज कोंबडा : 550


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button