कांद्याच्या भावात वाढ, पालेभाज्यांत घसरण
चाकण:खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट यार्डमध्ये हिरवी मिरची, गुजरातहून दाखल झालेला परवल, कांदा व लसणाचे भाव तेजीत राहिले. गुजरातमधील लोणच्याच्या कैर्यांची मोठ्या प्रमाणात आवक झाली.डांगर भोपळ्यासह इंदूर येथील गाजर, सातार्याहून आले, मुरबाडहून भेंडी दाखल झाली. जनावरांच्या बाजारात जर्शी गाई, बैल, म्हैस व शेळ्या-मेंढ्याच्या संख्येत घट झाली. एकूण उलाढाल 3 कोटी, 25 लाख रुपये झाली.
चाकण बाजारात कांद्याची एकूण आवक 1,800 क्विंटल झाली. गेल्या शनिवारच्या तुलनेत ही आवक दुपटीने वाढून भावात 500 रुपयांची वाढ झाली. कांद्याचा कमाल भाव 1,300 रुपयांवरून 1,800 रुपयांवर पोहोचला. बटाट्याची एकूण आवक 1,500 क्विंटल झाली. गेल्या शनिवारच्या तुलनेत ही आवक 250 क्विंटलने वाढल्याने भावात 200 रुपयांची घट झाली. बटाट्याचा कमाल भाव 2,000 रुपयांवरून 1,800 रुपयांवर स्थिरावला.
जळगाव भुईमूग शेंगा व बंदूक भुईमूग शेंगांची काहीच आवक झाली नाही. लसणाची एकूण आवक 35 क्विंटल झाली. गेल्या शनिवारच्या तुलनेत ही आवक 5 क्विंटलने घटल्याने भावात 1 हजार रुपयांची वाढ झाली. लसणाचा कमाल भाव 8 हजार रुपयांवरून 9 हजार रुपयांवर पोहोचला. हिरव्या मिरचीची एकूण आवक 330 क्विंटल झाली. गेल्या शनिवारच्या तुलनेत ही आवक 110 क्विंटलने घटून भावात घट झाली. हिरव्या मिरचीला 4 हजार रुपयांपासून 6 हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला.
शेतीमालाची आवक व बाजारभाव पुढीलप्रमाणे : कांदा : एकूण आवक – 1,800 क्विंटल. भाव क्रमांक 1 : 1,800 रुपये, भाव क्रमांक 2 : 1,300 रुपये, भाव क्रमांक 3 : 1,000 रुपये. बटाटा : एकूण आवक – 1,500 क्विंटल. भाव क्रमांक 1 : 1,800 रुपये, भाव क्रमांक 2 : 1,600 रुपये, भाव क्रमांक 3 : 1,400 रुपये.
फळभाज्यांची एकूण आवक क्विंटलमध्ये व प्रती 10 किलोंसाठी मिळालेला भाव कंसात पुढीलप्रमाणे : टोमॅटो : 185 क्विंटल (5,000 ते 7,000 रुपये), कोबी – 220 क्विंटल (500 ते 700), फ्लॉवर – 197 क्विंटल (600 ते 900), वांगी – 83 क्विंटल (1,000 ते 2,000), भेंडी – 135 क्विंटल (2,000 ते 4,000), दोडका – 63 क्विंटल (3,000 ते 4,000), कारली – 69 क्विंटल (2,000 ते 3,000), दुधीभोपळा – 62 क्विंटल (1,000 ते 2,000), काकडी – 74 क्विंटल (2,000 ते 3,000), फरशी – 69 क्विंटल (2,000 ते 3,000), वालवड – 63 क्विंटल (1,500 ते 2,500), गवार – 14 क्विंटल (7,000 ते 9,000), ढोबळी मिरची – 136 क्विंटल (2,000 ते 3,000), चवळी – 24 क्विंटल (2,000 ते 3,000), वाटाणा – 55 क्विंटल (5,000 ते 7,000), शेवगा – 30 क्विंटल (2,000 ते 3,000), गाजर – 130 क्विंटल (2,000 ते 3,000).पालेभाज्यांची एकूण आवक जुड्यांमध्ये व मिळालेला भाव कंसात पुढीलप्रमाणे : मेथी : एकूण 9 हजार 500 जुड्या (1,000 ते 2,000 रुपये), कोथिंबीर – एकूण 28 हजार 950 जुड्या (500 ते 1,500), शेपू – एकूण 3 हजार, 550 जुड्या (800 ते 1,200), पालक – एकूण 4 हजार 260 जुड्या (400 ते 600).जनावरांच्या बाजारात विक्रीसाठी आलेल्या 50 जर्शी गाईंपैकी 35 गाईंची विक्री झाली. गाईला कमीत कमी 14 हजार ते 70 हजार रुपयांचा भाव मिळाला. 90 बैलांपैकी 65 बैलांची विक्री 15 हजार ते जास्तीत जास्त 50 हजारांचा भाव मिळाला. 100 म्हशींपैकी 85 म्हशींची विक्री झाली. म्हशीला 30 हजार ते जास्तीत जास्त 80 हजारांचा भाव मिळाला. तर 9,750 शेळ्या-मेंढ्यांपैकी 9,375 शेळ्या-मेंढ्यांची विक्री झाली.