ताज्या बातम्यामहाराष्ट्र

पाऊस पडावं म्हणून असं काही केलं की गावात चर्चा जोरात


धाराशिव : धाराशिव जिल्ह्यात अद्यापपर्यंत बळीराजांनी म्हणावी तशी हजेरी लावलेली नाही. पाऊस न पडल्याने बळीराजा हवालदिल झाला. पाऊस पडावा म्हणून बळीराजा देवालाही साकडं घालत असतो. जून महिना संपला तरी पेरणी योग्य पाऊस पडला नाही.मुरूम शहरातील शेतकऱ्यांनी या नक्षत्राचे वाहन असलेल्या गाढवाचे लग्न निसर्गाबरोबर लावून दिले. गाढव सजवून त्याची शहरात मिरवणूक काढण्यात आली. या गाढवाच्या लग्नाची अनोख्या कार्यक्रमाची चांगली चर्चा सुरू आहे.

चक्क गाढवाचेच लगीन लावून दिले आहे. गाढवांना नवरदेवाप्रमाणे सजवून त्यांच्या गळ्यात हार घालत वाजत गाजत त्यांची गावभर मिरवणूक काढली. मोठ्या थाटामाटात गाढवाचं लग्न लावून देण्यात आले. हे वरूण राजाला साकडं घालण्यासाठीच गाढवाचे लग्न लावल्याचं गावकरी सांगत आहेत.

अशी आहे लोकांची धारणा

वेळेत पाऊस नाही झाला किंवा पेरण्यानंतर दीर्घ ओढ दिल्यास आणि ठिकाणी ज्या त्या वेळेतील नक्षत्राच्या वाहनांची कार्यक्रम घेतली जातात. अगदी बेडकाचीही लग्न लावले जाते. देवाला पाण्यात ठेवणे गाढवाचे लग्न गाढवाची मिरवणूक काढण्यात आले. पाऊस पडतो अशीही धारणा ग्रामीण भागात प्रचलित असल्याने यातूनच मुरूम शहरात गाढवाचे लग्न लावण्यात आले.

धोंडी मागून वरूण राजाला साकडे

पावसाळा सुरू होऊन महिनाभराचा कालावधी संपला तरी वाशिम जिल्ह्यात कुठेही पेरणीयोग्य पाऊस झाला नाही. लांबणीवर गेलेल्या पावसामुळे वाशिम जिल्ह्यातील खरिपातील ८० टक्के पेरण्या रखडल्या. मंगरूळपीर तालुक्यातील पार्डी ताड येथील ग्रामस्थांनी धोंडी मागुन वरूण राजाला साकडे घातले आहे.

जुन्या रुढी परंपरांचे पालन

यावेळी जुन्या रूढी परंपराना उजाळा देत गावातील नागरिकांनी कमरेला लिंबाचे डहाळे बांधून ‘धोंडी धोंडी पाणी दे दे दाय दाणा पिकु दे’ अशा स्वरूपात वरूण राजाकडे पावसाचे साकडे घालण्यात आले. विज्ञान तंत्रज्ञानाच्या युगात आजही ग्रामीण भागात पावसाला प्रसन्न करण्यासाठी जुन्या रूढी परंपराचे पालन केल्या जात आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button