अजितदादांचा महत्वाचा निर्णय! पवारांना आणखी एक धक्का
मुंबई: उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर आता अजित पवारांनी शरद पवारांना आणखी एक धक्का देणार आहेत. अजितदादांनी आता राष्ट्रवादी पक्षावरच दावा ठोकला असून प्रतोदपदी अनिल पाटील यांची नियुक्ती केली आहे.
आमदार अनिल पाटील हे प्रतोद पदी नियुक्त झाल्यानंतर आता शरद पवार गटातील आमदारांची चिंता वाढली आहे. अनिल पाटील यांनी या संदर्भात माहिती दिली. अजित पवारांच्या देवगिरी या निवासस्थानी सुरू असलेल्या बैठकीत पुढील निर्णय घेण्यात येणार आहे.अजित पवारांच्या नेतृत्वातील या बैठकीला त्यांच्यासोबत शपथ घेतलेल्या सर्व मंत्र्यांसह अन्य महत्वाचे नेतेही उपस्थित रहाणार आहेत. दरम्यान राष्ट्रवादी पवार गटातर्फे जितेंद्र आव्हाडांना प्रतोदपद व विरोधी पक्ष नेतेपद देण्यात आले आहे. या परिस्थितीवर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही या संदर्भात सूचक इशारा दिला आहे. लवकरच आपल्या सोबत असलेल्या आमदारांच्या संख्येची स्पष्टता कळेल, असे त्यांनी म्हटले.