पावसाचा आनंद लुटायला गेले आणि जीवाला मुकले, 5 मित्रांचा दुर्दैवी अंत
नागपूर : नागपुरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. रविवार हा मित्रांसाठी घातवार ठरला आहे. तलावावर फिरण्यासाठी गेलेल्या 5 जिवलग मित्रांचा तलावात बुडून मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात दु:खाचं वातावरण आहे.
नागपुरात शोककळा पसरली आहे. पाच मित्र मोहगाव झिल्पी इथे रविवारी सुट्टीचा आनंद घेण्यासाठी तलावात पोहोयला गेले. आधीच पाऊस वाढलेलं पाणी त्यात तलावात पोहण्याचा मोह त्यांना आवरला नाही. चौघेही पट्टीचे पोहणारे नव्हते.
तरीही एकमेकांच्या मदतीने पाण्यात उतरले. 2 मिनिटात झालं होत्याचं नव्हतं! मुलाखतीसाठी पुण्याला जाणाऱ्या कौस्तुभचं बहिणीशी बोलणं ठरलं अखेरचं तलावाच्या काठावर थोडावेळ घालवला. मग पोहण्याच्या नादात पुढे गेले.
ऋषिकेश कधी खोल पाण्यात गेला याचं त्याला भानच उरलं नाही. त्याच्यामागे आणखी तिघे गेले. पाण्याचा अंदाज न आल्याने अखेर चौघेही बुडाले. त्यांना वाचवण्याची धडपड पाचवा मित्र करत होता.
त्या नादात तोही बुडाला आहे. ऋषिकेश शंतनू, राहुल, प्राजक्त आणि वैभव अशी पाच मित्रांची नाव असल्याची माहिती मिळाली आहे. या पाचही मित्रांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. मोह आवरता आला नाही त्यामुळे हा मोठा अनर्थ घडला आहे. पावासाच्या दिवसांमध्ये अशा ठिकाणी नको ते धाडस करणं त्यांच्या अंगाशी आलं. ऋषिकेश पराळे (वय 21) राहुल मेश्राम (वय 23), वैभव भागेश्वर वैद्य (वय 24) शंतनू अरमरकर (वय 23) आणि नितीन नारायण कुंभारे अशी मृत तरुणांची नाव असल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेमुळे नागपुरात खळबळ उडाली असून नको ते धाडस न करण्याचं आवाहन पोलिसांनी केलं आहे.