पवार कुटुंबाचं मूळ गाव असलेल्या काटेवाडीतील ग्रामस्थांचा कल कोणाकडे? पाहा.
बारामती :अजित पवार यांनी भाजपसोबत हातमिळवणी केली आहे. अशात राष्ट्रवादीच्या नेत्यांची, कार्यकर्त्यांची भूमिका काय असा सवाल उपस्थित होत आहे. अशा सगळ्या परिस्थितीत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचं मूळ गाव असलेल्या काटेवाडीमध्ये नेमकी काय परिस्थिती आहे.
काटेवाडीतील लोकांना या सगळ्या घडामोडींवर काय वाटतं? हे आम्ही जाणून घेतलं.
काटेवाडी ग्रामपंचायत येथील लोकांच्या मनात काय? पवार कुटुंबाचे मूळ गाव असलेल्या काटेवाडीतील ग्रामस्थांचा कल कोणाकडे? या प्रश्नांची उत्तरं आम्ही जाणून घेतली.
काटेवाडीमधील काहीजणांनी शरद पवार यांना आपला पाठिंबा दिला तर काहींनी अजित पवार यांच्या भूमिकेचं समर्थन केलं.
कॉलेजमध्ये शिकणाऱ्या एका युवकाने शरद पवार यांना पाठिंबा दिला आहे. मी 20 वर्षांचा आहे पण मी 80 वर्षाच्या युवकासोबत आहे, अशी प्रतिक्रिया त्या तरूणाने दिली आहे.
साहेबांनी दगडाला शेंदूर फासून म्हसोबा केला. तसंच आताही पवारसाहेब दुसऱ्या दगडाला शेंदूर फासून निवडून आणतील, असंही एका व्यक्तीने म्हटलं आहे.