ताज्या बातम्यामहाराष्ट्र

BMC अधिकारी मारहाण प्रकरणी परब यांना मोठा दिलासा; आरोपपत्रात नावच नाही


मुंबई: बीएमसी वॉर्ड ऑफिसात घुसून अधिकाऱ्याला मारहाणप्रकरणी शिवसेना ठाकरे गटाचे आमदार अनिल परब (Anil Parab) यांच्याबाबत कोर्टाने मोठा निर्णय घेतला आहे. अनिल परब आरोपी नाहीत असा निर्णय कोर्टाने दिला आहे.कोर्टाच्या निर्णयामुळे अनिल परब यांच्यावरील अटकेची कारवाई टळली आहे. बीएमसी अधिकारी मारहाणप्रकरणी चौघांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

महापालिका अधिकारी मारहाणप्रकरणी अनिल परबांसह 5 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. त्यातल्या 4 जणांना अटक करण्यात आलीय. कोणत्याही क्षणी अनिल परबांना अटक होण्याची शक्यता वर्तवली जात होती आहे. अनिल परब यांना पोलिसांनी चौकशीसाठीही बोलावले होते. तर, अटक झाली तरी चालेल कोर्टात दाद मागणार असं परबांनी म्हंटले होते. मात्र, कोर्टाने दिलेल्या निर्णयामुळे अविल परब यांना मोठा दिलासा मिळाला आहे. या प्रकरणात कोर्टाने अनिल परब हे आरोपी नसल्याचे म्हंटले आहे. यामुळे त्यांच्यावरील अटकेची कारवाई टळली आहे.

दरम्यान, अधिकारी मारहाण प्रकरणात सोमवारी रात्री माजी नगरसेवक हाजी हालीम खान, सदा परब, उदय दळवी, संतोष कदम यांना अटक करण्यात आली होती. या चौघांना कोर्टाने पोलिस कोठडी सुनावली आहे.

काय आहे नेमकं प्रकरण?

26 जून रोजी माजी मंत्री अनिल परबांच्या नेतृत्त्वात मुंबईच्या सांताक्रूझमध्ये ठाकरे गटाने जनआक्रोश मोर्चा काढला होता. मुंबई महापालिकेच्या एच पूर्व प्रभाग कार्यालयावर हा मोर्चा काढण्यात आला होता. अनियमित, अपुरा पाणीपुरवठा, दूषित पाणी यामुळे महिलांनी महापालिकेच्या ऑफिसवर धडक दिली होती. या मोर्चावेळीच मारहाणीचा प्रकार घडला. ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी बीएमसी वॉर्ड ऑफिसात घुसून अधिका-याला मारहाण केली. विशेष म्हणजे यावेळी ठाकरे गटाचे आमदार आणि माजी मंत्री अनिल परब स्वत: उपस्थित होते. तरीही त्यांच्या उपस्थितीत अधिका-याला मारहाण केली.

अधिकाऱ्याला मारहाण का केली?

शिवसेना ठाकरे गटाच्या संतप्त कार्यकर्त्यांनी मुंबई महानगरपालिका अधिका-याला मारहाण केली. वांद्र्यातील शिवसेनेची अनधिकृत शाखा तोडताना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या फोटोची तोडफोड झाल्यानं शिवसैनिक संतापले होते. यामुळेच याच रागातून कार्यकर्त्यांनी मुंबई महापालिका वॉर्ड ऑफिसमध्ये जाऊन अधिका-याला मारहाण केल्याचे समजते.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button