मिस्टर फडणवीस तुम्ही गृहमंत्री असाल तर आम्ही शिवसैनिक आहोत; संजय राऊत यांचा इशारा
शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई महापालिकेवर प्रशासनाविरुद्धच्या मोर्चाची तारीख जशी जवळ येऊ लागली आहे, तसं ठाकरे गट आक्रमक झाला होत असल्याची चिन्ह आहेत.सोमवारी शिवसेना शाखा पाडल्यानंतर ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी आक्रमक भूमिका घेतली. त्यानंतर आज खासदार संजय राऊत यांनीदेखील आक्रमक पवित्रा घेतला आहे. बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या प्रतिमेचा कोणी अपमान करत असेल तर अनिल परब (Anil Parab) काय, मी काय सामान्य शिवसैनिक असे अनेक गुन्हे अंगावर घ्यायला तयार आहोत, मिस्टर फडणवीस तुम्ही गृहमंत्री असाल तर आम्ही शिवसैनिक आहोत असा इशारा संजय राऊत (Sanjay Raut) यांनी दिला.
मुंबई महापालिकेत मागील एक वर्षापासून रस्ते काम आणि इतर कामांमध्ये मोठा भ्रष्टाचार सुरू असल्याा आरोप करत शिवसेना ठाकरे गटाने एक जुलै रोजी महापालिकेवर मोर्चा काढणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यानंतर ठाकरे गट अधिकच आक्रमक होत असल्याचे चित्र आहे. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले की, एक जुलै रोजी हा एक अतिरेक्यांचा मोर्चा आहे का असा सवाल करत हा नागरिकांचा मोर्चा आहे. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न असेल तर फडणवीसांनी राजीनामा द्यावा. त्यांच्यामुळे कायदा सुव्यवस्था ढासळली आहे, असेही राऊत यांनी म्हटले. 40 वर्षानंतर शिवसेनेची ती शाखा बेकायदेशीर आहे, हे कळलं कास असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. शाखा पाडण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावरून आदेश आलेत. मुख्यमंत्र्यांच्या मुलानेच हे आदेश दिले असल्याचा आरोप राऊत यांनी केला. बाळासाहेब ठाकरे यांना शासनाने राष्ट्रपुरुषांचा दर्जा दिला आहे.. कायद्यानुसार आता अभियंत्यावर कारवाई करणार का असा प्रश्नही त्यांनी केला. बाळासाहेब ठाकरे यांचा अपमान कोणत्याही परिस्थितीत सहन करणार नसल्याचे त्यांनी सांगितले. मिस्टर फडणवीस तुम्ही गृहमंत्री असाल तर आम्ही शिवसैनिक आहोत असा इशाराही राऊत यांनी दिला. कायदा आणि सुव्यवस्थेच्या मुद्यावर ठाकरे गटाच्या मोर्चाला परवानगी नाकारण्यात येणार असल्याची चर्चा सुरू आहे. ही परवानगी नाकारली तर ठाकरे गट काय करणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहेत.
भ्रष्टाचाराच्या मुद्यावर प्रश्न उपस्थित केले, तुम्ही संसद चालू दिली नाही…
पंतप्रधान मोदी यांच्या भाषणावरही संजय राऊत यांनी टीका केली. पंतप्रधान मोदी हे स्वत: पक्षातील भ्रष्टाचाऱ्यांबाबत बोलत नाही. अनेक मंत्री, आमदारांच्या भ्रष्टाचाराचे पुरावे देण्यात आले. पण, त्यावर कोणतीही कारवाई झाली नाही.
आमच्या पक्षात या आणि भ्रष्टाचार करा असे सत्ताधाऱ्यांकडून सांगण्यात येत असल्याचा आरोप राऊत यांनी केला. पंतप्रधान मोदींनी देशातील भ्रष्टाचारांवर बोलावं असं आवाहनही त्यांनी केलं. राहुल गांधी आणि विरोधकांनी भ्रष्टाचाराच्या मुद्यावर प्रश्न उपस्थित केले. त्यावेळी तुम्ही संसद चालू दिली नाही नसल्याचेही राऊत यांनी म्हटले. पंतप्रधान मोदी यांनी मणिपूरमधील हिंसाचाराबद्दल एक चकार शब्दही बोलले नाहीत. महागाईवर बोलले नाही, लोकांच्या प्रश्नावर बोलले नसल्याचे राऊत यांनी म्हटले.