ताज्या बातम्यामहाराष्ट्र

सघन पद्धतीने कपाशी लागवड


अकोला: या हंगामात सघन पद्धतीने कपाशीला शेतकऱ्यांनी सुरुवात केली आहे. शुक्रवारी (ता. २३) जिल्ह्यातील मालवाडा शिवारात दिलीप ठाकरे यांच्या शेतात जिल्हास्तरीय कृषी अधिकारी, शास्त्रज्ञांच्या उपस्थितीत लागवडीस प्रारंभ झाला.श्री. ठाकरे हे मागील काही वर्षांपासून सघन पद्धतीने कापूस लागवड करीत आहेत. आता त्यांच्यासह इतर शेतकरीसुद्धा यासाठी पुढे आले आहेत. जिल्ह्यात यंदा अशा पद्धतीने सुमारे १० हजार एकरांपेक्षा जास्त क्षेत्रावर लागवडीचे नियोजन झाले आहे. अद्याप पुरेसा पाऊस झालेला नसला तरी हवामान खात्याचे अंदाज लक्षात घेता शेतकरी लागवडीसाठी पुढे येऊ लागले आहेत.

Cotton Cultivation : सघन कापूस लागवड ओलांडणार यंदा दहा हजार एकरांचा टप्पा
सिंचनाची सोय असल्याने श्री. ठाकरे यांनी शुक्रवारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे, आत्मा प्रकल्प संचालक डॉ. मुरली इंगळे, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कृषी विद्यावेत्ता डॉ. प्रकाश घाटोळ, जिल्हा परिषद कृषी विकास अधिकारी एस .टी .चांदूरकर, कृषी उपसंचालक संध्या करवा, पशुसंवर्धन अधिकारी डॉ. मुरूमकर, बाळापूर तालुका कृषी अधिकारी नंदकुमार माने, मंडळ कृषी अधिकारी शिवाजी जाधव, बियाणे कंपनी प्रतिनिधी उमेश भगत, अंकुश जाधव, गौरव मानकर यांच्यासह इतर शेतकरी उपस्थित होते.

यंत्राचा साह्याने ही लागवड सुरू झाली आहे. विधिवत पूजनानंतर पहिल्याच दिवशी आठ ते नऊ एकरांत सघन पद्धतीने कपाशी बियाण्याची पेरणी करण्यात आली. एकरी सहा बॅग बियाणे या पद्धतीत वापरले जाते. एकरी झाडांची संख्या ही २५ हजारांवर ठेवली जाते. त्यामुळे शाश्वत उत्पादन मिळतो, असा या शेतकऱ्यांचा अनुभव तयार झालेला आहे.

या पद्धतीने लागवडीबाबत श्री. ठाकरे यांनी अधिकाऱ्यांना तांत्रिक माहिती, आजवरची उत्पादकता, पिकाचे व्यवस्थापन तसेच खत, कीडनाशक व्यवस्थापनाची माहिती दिली.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button