शोले आंदोलन शेतकर्यांच्या समस्यांकडे वेधले लक्ष
मनोरा:शासनाने दिवाळीपूर्वी अतिवृष्टीची आर्थिक मदत देण्याचे जाहीर केले होते. मात्र, आजपर्यंत १० टक्के शेतकर्यांना आर्थिक मदत मिळाली असून, इतर शेतकरी मदतीपासून वंचित आहेत याबाबत शासन व प्रशासनाला कळवून देखील कुठल्याच प्रकारचा न्याय मिळत नसल्याने महंत रमेश महाराज यांनी २६ जून रोजी भर पावसात पोहरादेवी येथील पाण्याच्या टाकीवर शोले आंदोलन पुकारून शेतकरी व सर्वसामान्य जनतेच्या विविध मागण्या संदर्भात मागणी केली. यावेळी तासभरानंतर लेखी पत्राद्वारे आंदोलन मागे घेण्यात आले.
दोन आठवडा भरापूर्वी महंत रमेश महाराज यांनी शेतकर्यांसह तहसीलदार यांना निवेदन देऊन ९० टक्के शेतकर्यांना अतिवृष्टीची आर्थिक मदत खात्यात जमा करावे, Sholay movement यासह वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करावा, लाभार्थ्यांना घरकुल मंजूर करावे, वाढती महागाईवर अंकुश लावावा यासह विविध मागण्याबाबत अवगत केले होते. सदर मागण्या मान्य न झाल्याने आंदोलनाचा इशारा छेडण्यात आला. यावेळी आंदोलनात शेतकरी व शेतमजूर सहभागी झाले होते. आंदोलनस्थळी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात होता.