शिक्षकाचा विद्यर्थिनीवर अत्याचार; पोस्कोअंतर्गत गुन्हा दाखल
जामखेड:जामखेड तालुक्यात एक शिक्षकाने शाळेतील 14 वर्षीय विद्यार्थिनीला अभ्यास करण्यासाठी तिच्याशी ‘स्नॅपचॅट’च्या माध्यमातून जवळीक साधली.
तिचे अर्धनग्न फोटो व्हायरल करण्याची धमकी देत अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. यामुळे शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. आरोपी शिक्षक राधाकिसन उर्फ राधे मुरुमकर यास अटक केली असून, श्रीगोंदा सत्र न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 26 जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
तालुक्यातील शाळेत शिकत असलेल्या 14 वर्षीय अल्पवयीन मुलीची अभ्यासासाठी तिच्याशी स्नॅपचॅट अॅपच्या माध्यमातून जवळीक साधली. शिक्षकाने अर्धनग्न फोटो पाठविण्यास सांगितले. हे फोटो मिळाल्यानंतर सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देवून 14 जून रोजी दुपारी त्या मुलीला जामखेड येथून बीड जिल्ह्यातील आष्टीच्या लॉजवर नेल्यानंतर तिच्याशी बळजबळीने अत्याचार केला. याबाबत कोणाला काही सांगितले, तर तिथे अर्धनग्न फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली.
यावरून आरोपी राधाकिसन याच्यावर पोस्कोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पीडित मुलीची जामखेडच्या ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. हा गुन्हा गंभीर असून, आरोपीचीही वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. त्याला पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता 26 जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.