गेवराई तालुक्यातील वाळू तस्कराकडून पैठण तहसीलदारासह पथकावर दगडफेक
पैठण: हिरडपुरी गोदावरी नदीतून अवैधरित्या वाळू तस्करी रोखण्यासाठी गेलेले पैठणचे तहसीलदार सारंग चव्हाण आणि वाळू विरुद्ध पथकावर दगडफेक करण्याात आली.
वाळू विरुद्ध पथकावर कारवाई केल्यामुळे सुरळगाव ता. गेवराई जिल्हा बीड येथील काही वाळू तस्करांनी पथकावर दगडफेक केली. यामध्ये एक कोतवाल जखमी झाल्याची घटना बुधवारी (दि.२१) दुपारी घडली आहे.
मिळालेली माहिती अशी की, पैठण तालुक्यातील हिरडपुरी येथील गोदावरी नदीत गेल्या काही दिवसापासून रात्री व दिवसा ढवळ्या मोठ्या प्रमाणावर अवैधरित्या वाळूची तस्करी सुरू आहे. नवीन रुजू झालेले तहसीलदार सारंग चव्हाण यांनी स्वतः बुधवारी महसूल विभागाचा वाळू विरुद्ध पथकातील मंडळ अधिकारी गणेश सोनवणे, केकान, तलाठी राम केंद्रे, कोतवाल सतीश दळवे, चालक भारत धारकर या पथकासोबत हिरडपुरी येथील गोदावरी नदीत अचानक कारवाईसाठी गेले. या ठिकाणी गेवराई तालुक्यातील सुरळगाव येथील वाळू तस्कर पैठण तालुक्याच्या हद्दीतून अवैधरित्या वाळू उपसा करून ट्रॅक्टरना वाहतूक करताना आढळून आले.
यावेळी पाकातल्या महसूल कर्मचाऱ्यांनी सदरील ट्रॅक्टर पकडून तहसील कार्यालयात जमा करण्यासाठी घेऊन जात असताना महसूल पथकाची व वाळू तस्करांची या ठिकाणी चांगलाच वाद निर्माण होऊन. वाळू तस्करांनी केलेल्या दगडफेकीत कोतवाल सतीश दळवे यांच्या डोक्याला दगडाचा मार लागल्यामुळे सदरील कोतवाल जखमी झाला आहे. त्यामुळे तहसीलदार सारंग चव्हाण यांनी हिरडपुरी येथील गोदावरी नदीतून एक ट्रॅक्टर सह मोटर सायकल जप्त करून पैठण येथे तहसील कार्यालयात आणण्यात आली असून जखमी कोतवालावर उपचार केला असून. यासंदर्भात पाचोड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.