ताज्या बातम्या

माणसांच्या हाडांसोबत सापडली ३००० वर्षांपूर्वीची तलवार; फोटो पाहिलात का?


जर्मन पुरातत्वशास्त्रज्ञांना मोठा खजिना सापडला आहे. एका कबरीमध्ये कांस्य युगामधली पूर्णतः सुरक्षित तलवार त्यांना सापडली आहे. ही तलवार ३००० वर्षांपेक्षाही जुनी आहे. पण तरीही या तलवारीवर एक साधा स्क्रॅचही नाही. या शास्त्रज्ञांच्या मते, ही तलवार नव्यासारखी चमकत आहे.

बवारिया स्टेट ऑफिस फॉर द प्रिझर्वेशन ऑफ हिस्टोरीकल मॉन्युमेंट्सने दिलेल्या माहितीनुसार, ही तलवार इसवी सन पूर्व १४ म्हणजे कांस्य युगाच्या मध्यातली आहे. दक्षिण जर्मनीमध्ये गेल्या आठवड्यात ही तलवार सापडली.

तीन लोकांची हाडंही सापडली

ही तलवार एका कबरीमध्ये आढळली आहे. तलवारीशिवाय तीन व्यक्तींची हाडंही सापडली आहे. संशोधकांचा अंदाज आहे की ही हाडं एक पुरुष, एक स्त्री आणि एका लहान मुलाची आहेत. पण या तिघांचा एकमेकांशी काय संबंध आहे, याबद्दल काही माहिती हाती आलेली नाही.

बवारिया स्टेट ऑफिस फॉर द प्रिझर्वेशन ऑफ हिस्टोरीकल मॉन्युमेंट्सचे प्रमुख मॅथियस फायल यांनी सांगितलं की, तलवार आणि कबरीचा तपास करावा लागेल. त्यानंतरच पुरातत्वशास्त्रज्ञ याबद्दल व्यवस्थित माहिती देऊ शकतील. अशा पद्धतीच्या वस्तू मिळणं दुर्लभ आहे.

अष्टकोनी आकारातली तलवार

काही माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, या तलवारीचा आकार अष्टकोनी आहे. त्यामुळे ही तलवार आणखी दुर्मिळ ठरते. ही तलवार बनवण्यासाठी अत्यंत कुशल कारागीरांची आवश्यकता असते. या प्रकारच्या तलवारींच्या हँडलच्या वर ब्लेड लावलं जातं, त्याला ओवरले कास्टिंग असं म्हणतात. इनले आणि हॉलमार्कच्या मदतीने याची सजावटही केली जाते.

अशा पद्धतीची तलवार त्या काळामध्ये जर्मनीतल्या फक्त दोनच ठिकाणी बनवली जायची. एक म्हणजे उत्तर जर्मनी आणि दक्षिण जर्मनीमध्ये. हा शोध यासाठी महत्त्वाचा आहे की जर्मनीमध्ये अनेक कबरी खोदून त्यातल्या तलवारी लुटण्यात आल्या होत्या.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button