गर्भवती पत्नी जेलमधील पतीला भेटायला गेली, चेहरा पाहताच कोसळली, झाला दुर्दैवी मृत्यू
पाटणा : पतीला भेटण्यासाठी एक गर्भवती महिला तुरूंगात आली. मात्र पतीचा चेहरा पाहताच ती बेशुद्ध होऊन कोसळली ते उठलीच नाही. तिचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बिहारमधील भागलपूर येथे हीी दुर्दैवी घटना घडली.
तुरूंगात खाली कोसळल्यानंतर त्या महिलेला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र तेथील डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. पतीला तुरूंगात अशा अवस्थेत तिला पहावले नाही आणि मोठा धक्का बसला व ती बेशुद्ध झाली. मृत महिलेच्या कुटुंबियांनी पोलिसांना या घटनेसाठी जबाबदार ठरवले आहे.
6 जून रोजी ही गर्भवती महिला तिच्या पतीला भेटण्याचा हट्ट करू लागली. सासरच्यांनी तिला समजावण्याचा खूप प्रयत्न केला, मात्र तिने कोणाचेच ऐकले नाही. कोणत्याही परिस्थितीत पतील भेटायचेच आहे, असे ती म्हणू लागली. अखेर सासरच्या लोकांनी तिचे ऐकले आणि ते तिला घेऊन भागलपूर येथील कारागृहात घेऊन गेले.
तेथे गेल्यावर पती तिच्यासमोर आला. त्याचा चेहरा बघितला अन् ती धाडकन खाली कोसळली. कारागृहातील अधिकारी व महिलेच्या नातेवाईकांनी तिला तातडीने रुग्णालयात नेले, मात्र तो पर्यंत तिचा मृत्यू झाला होता.
दोन वर्षांपूर्वी झाले होते लव्ह मॅरेज
दोन वर्षांपूर्वी गोविंदपूर येथे राहणारा गुड्डू याचा विवाह पल्लवीशी झाला. काही दिवसांपूर्वी गुड्डू आणि विनोद यादव यांच्या दरम्यान जमीनीवरू काही वाद झाला. दोन्ही कुटुंबियांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानंतर गुड्डूला तुरूंगात जावे लागले. तेव्हा पल्लवी गर्भवती होती. गेल्या ७-८ महिन्यांपासून गुड्डू जेलमध्येच होता. पल्लवीची लवकरच डिलिव्हरी होणार होती. त्यापूर्वी पतीला भेटण्यासाठी ती जेलमध्ये गेली मात्र धक्का बसल्याने ती बेशुद्ध झाली आणि तिचा जीव गेला. यामुळे एक कुटुंब उध्वस्त झालं. पल्लवी आणि तिचं बाळ (जगात येण्यापूर्वीच) दोघेही दगावले. पत्नीच्या मृत्यूनंतर गुड्डू याला अंत्यसंस्कारासाठी कडक सुरक्षेत जेलच्या बाहेर जाण्याची परवानगी देण्यात आली.
तर या प्रकरणी गुड्डू याचा भाऊ विकी याने पोलिस प्रशासनावर आरोप केला आहे. पोलिसांच्या बेपर्वाईमुळे वहिनीचा जीव गेल्याचे त्याचे म्हणणे आहे. पोलिसांनी आपल्या भावाला जबरदस्तीने तुरूंगाच टाकले. विरोधी पार्टी पैसेवाली असल्याने असे करण्यात आले. आता आमचं सगळ कुटुंब उध्वस्त झाला आणि पोलिसच याला जबाबदार असल्याचे त्याने म्हटले.