ताज्या बातम्या

विरोधी पक्ष – सत्ताधारी मराठा समाजाच्या नेत्यांमुळेच मराठ्यांना ओबीसी पासून वनवास ! विठ्ठल राजे पवार यांचा आरोप.


विरोधी पक्ष – सत्ताधारी मराठा समाजाच्या नेत्यांमुळेच मराठ्यांना ओबीसी पासून वनवास !
विठ्ठल राजे पवार यांचा आरोप.

मराठा समाजाने 01 जुलै 2023 रोजी राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये “विशेष ग्रामसभा बोलावून मराठा समाजाला स्वतंत्र ओबीसी संरक्षण आरक्षण मिळण्यासाठी ग्रामसभा घेऊन विशेष ठराव करावेत असे आव्हान मुंबई आझाद मैदान येथील आंदोलना स्थळी मराठा वनवास यात्रेच्या आंदोलकांची भेट दिनांक 7 जुन रोजी घेतली त्यावेळी विठ्ठल पवार राजे यांनी मराठा समाजातील युवक युवतींना अवहान केले आहे.

मुंबई.
दिनांक 08जून 2023.
राज्यामध्ये 400 हून अधिक विधानसभा, राज्य सभा आमदारांपैकी आणि केंद्रात निम्मे हून अधिक खासदार मंत्री, असे सुमारे दोनशे सव्वा दोनशे आमदार, खासदार हे मराठा समाज व संबंधित आहेत तरी देखील मराठ्यांना गेल्या 63 वर्षांमध्ये महाराष्ट्र, आणि भारताच्या 75 व्या अमृत वर्षापर्यंत ओबीसी आरक्षण नोंदणी मान्यते पासून वनवास भोगाव लागतो आहे. त्याला राज्यातील विरोधी पक्ष आणि सत्ताधारी, मराठा मतदारा नागरिक देखील तितकेच जबाबदार आहेत असा सनसनाटी आरोप शरद जोशी विचारमंच शेतकरी संघटनेचे अध्यक्ष तथा राष्ट्रीय निमंत्रक विठ्ठल पवार राजे यांनी आझाद मैदान येथे 6 मे 2023 पासून तुळजापूर ते मुंबई मंत्रालय योगेश केदार, पवनराजे घोगरे पाटील, सुनील नागणे, प्रवीण पवार, रणजित चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली शेकडो मराठा युवक, युवती शेकडो किलोमीटर पायी प्रवास करत सुरू असलेल्या मराठा वनवास यात्रेच्या पदाधिकाऱ्यांची आझाद मैदान येथे दिनांक 7जुन रोजी भेट घेतली. त्यानंतर मुंबई पत्रकार भवन येथे त्यांनी पत्रकारांशी भेट घेतली त्यावेळी ते बोलताना सांगितले की राज्यातील विरोधी पक्ष हे हा सत्ताधाऱ्यांपेक्षा अधिक जबाबदार आहे म्हणून मराठ्यांना ओबीसीचं आरक्षण न मिळता वनवासी यात्रा काढावी लागत आहेत यासारखे दुर्दैव नाही. ते पुढे म्हणाले की विरोधी पक्ष आणि सत्ताधाऱ्या मराठी नेत्यांमुळेच मराठा समाजाला ओबीसी पासून वनवास मिळला आहे. अता मराठा समाजाने 01 जुलै 2023 रोजी राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये “विशेष ग्रामसभा बोलावून मराठा समाजाला स्वतंत्र ओबीसी संरक्षण मिळण्यासाठी ग्रामसभा घेऊन योगेश केदार यांनी सुरू केलेल्या मराठा वनवास आंदोलनाला विशेष ठराव करून पाठींबा द्यावा असे आव्हान आझाद मैदान येथील आंदोलना स्थळी. विठ्ठल पवार राजे यांनी मराठा समाजातील युवक युवतींना अवहान केले आहे.

मराठा समाजातील मोठ मोठे राजकारणी मंत्री आमदार खासदार हे गेल्या 75 वर्ष मराठा समाजाला झुलवत ठेवण्यामध्ये मशगुल त्यात त्यांनी स्वतःची धन्यता मानत स्वतःच्या नातेवाईकांना राज्यकर्ते आणि गब्बर सिंग बनवून टाकलेले आहे त्यामुळे त्यांना आरक्षणाची आवश्यकता राहिलेली नाही. पण आरक्षणा पासून मराठा समाजाला जानीवपुर्वक वंचित ठेवून वारंवार निवडणुका जिंकून सत्ता काबीज करत, मराठा समाजाला खितपत ठेवणे हे एकमेव घाणेरडे उद्दिष्टेन मराठा समाजातील नेत्यांनी आजपर्यंत मराठा समाजावर केलेला घोर अन्याय आहे त्याविरुद्ध सर्वांनी आवाज उठवणे हे आपले कर्तव्य आहे. आलिकडचे काळात राज्यातील आणि देशातील मराठा समाजातील नागरिक हा आता बर्यापैकी सुज्ञान, जागरूक झालेला आहे. मला देशातील नव्हे तर खास करून महाराष्ट्र राज्यातील मराठा समाजाच्या सर्व युवक युवती आणि सज्ञान नागरिकांना माझी विनंती आहे की महाराष्ट्र राज्यातील 27 हजार ग्रामपंचायतीमध्ये, मराठा समाजाला ओबीसी संरक्षण आरक्षण मागणीचे ग्रामसभेचे ठराव करून पाठींबा द्यावा, अशा वेगळ्या मार्गाने मराठ्यांना ओबीसीचं आरक्षण मागण्याची वेळ आलेली आहे त्यामध्ये मराठा समाजांनी, आज जे सत्तेमध्ये आणि विरोधी पक्षांमध्ये बसलेले मराठा समाजातील आणि सत्ताधारी पक्षातील जे कोणी आमदार खासदार आपल्या पक्षाचे असो किंवा विरोधी पक्षाचे असो मराठा समाजातील असो किंवा इतर जाती जमातीचे असो या सर्वांना 2024 मध्ये घरचा रस्ता आणि त्यांची जागा दाखवल्याशिवाय मराठा समाजाला ओबीसीचं आरक्षण मिळू शकणार नाही ही कळ्या दगडावरची पांढरी रेघ राहिलेली आहे अशी तिखट प्रतिक्रिया राजे पवार यांनी यावेळी आझाद मैदान येथे मांडली.
ते पुढे म्हणाले की माझी महाराष्ट्र राज्यातील मराठा समाजातील तमाम युवक, युवती, महिला, पुरुष, जेष्ठ नागरिकांना माझी विनंती आहे की 01 जुलै 2023 रोजी राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये विशेष ग्रामसभा बोलावून त्या ठिकाणी ग्रामसभेत मराठ्यांना ओबीसीत आरक्षण मिळावं असे ठराव राज्यातील हजारो ग्रामपंचायतीच्या माध्यमातून, *प्रति माननीय राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, राज्यपाल, लोकसभा, राज्यसभा, अध्यक्ष महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विधानसभा व विधान परिषदेचे अध्यक्ष, ऊपाध्यक्ष यांचे नावे ग्रामसभेचे विशेष ठरावाद्वारे वंचित मराठा समाजाला ओबीसी संरक्षण आरक्षण मागणी नोंदवून ते सर्व ठराव मिळवून ते शरद जोशी विचारमंच शेतकरी संघटने कडे पाठवावेत. कारण स्वातंत्र्यप्राप्तीनंतर मराठा समाजातील नागरिकांना देखील चुकानाने सन्मानित जगण्याचा अधिकार असला पाहिजे आणि तो इतर समाजांनी देखील त्यांना दिला पाहिजे आम्हाला कोणाच्या वाट्याचे नको परंतु आमच्या वाट्याचे आरक्षण मिळाले पाहिजे असा आशय त्यांनी यावेळी पत्रकारांसमोर मांडला. राज्यातील मराठा समाजाला, मागासलेल्या मराठा समाजाला आर्थिक स्वातंत्र्यांमध्ये सुखाने व सन्मानाने जगता यावे याकरिता मराठा समाजाला, ओबीस आरक्षण मिळावे अशी अपेक्षा यावेळी संघटनेचे अध्यक्ष विठ्ठल पवार राजे यांनी व्यक्त केली, यावेळी मराठा वनवास आंदोलनाचे नेते योगेश केदार, सुनील नागणे, पवनराजे घोगरे पाटील, प्रताप कांचन, रणजीत चव्हाण, प्रवीण पवार आदी आंदोलनाचे युवक पदाधिकारी उपस्थित होते
ओबीसी आरक्षणामध्ये सर्वसामान्य आर्थिक मागासलेल्या मराठी समाजातील युवक युवतींना संरक्षण मिळण्यासाठी ओबीसी मध्ये समावेश करून घेण्याचा यशस्वी लढा संघ़टना संपूर्ण तातडीने न्यायिक लढेल आणि मराठा समाजाला ओबीसी संरक्षण मिळवून देईल अशा अपेक्षा यावेळी विठ्ठल पवार राजे यांनी बोलून दाखवली यावेळी संघटनेचे राष्ट्रीय पदाधिकारी निवृत्ती भराटे राज्याचे टेक्निकल समितीचे अध्यक्ष संजय वाडे संघटनेचे पुणे जिल्हा शहर युवक अध्यक्ष अनिल भांडवलकर उपस्थित होते.

 

 


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button