पुणे विमानतळावरुन आता कोट्यवधी लोकांना करता येणार हवाई उड्डाण, काय, काय आहेत सुविधा
पुणे : पुणे येथील लोहगाव विमानतळावर विविध सुविधा सुरु केल्या जात आहेत. या विमानतळावर यापूर्वी रन वे लायटिंगचे काम करण्यात आले. यामुळे लोहगाव विमानतळावरून २४ तास विमानवाहतूक सुरु झाली.
विमानतळ २४ तास खुले झाल्यानं विमानाच्या फेऱ्या वाढल्या. त्यामुळे प्रवासी संख्याही वाढली. गेल्या वर्षभरात पुणे 80 लाख प्रवाशांनी प्रवास केला. पुणे विमानतळावर सुरु होणाऱ्या सेवेमुळे प्रवाशांची संख्या कोट्यवधीमध्ये जाणार आहे.
काय आहेत सुविधा
पुण्यात विमान प्रवासी वाहतुकीत सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे सध्या असलेल्या इमारतीत प्रवाशांची मोठी गर्दी होते. या पार्श्वभूमीवर प्रवाशांची गर्दी कमी करण्यासाठी पुणे विमानतळ प्राधिकरणाने 5 लाख चौरस फुटापेक्षा जास्त क्षेत्रफळ आणि अत्याधुनिक सोयीसुविधा असलेलं इंटिग्रेटेड टर्मिनल बांधले आहे. या टर्मिनलमुळे दरवर्षी 1 कोटींपेक्षा जास्त प्रवासी प्रवास करु शकणार आहे.
प्रवासी संख्येचा उच्चांक
कोरोनाचा काळात सर्वात मोठा फटका विमान प्रवासाला बसला होता. कोरोना काळात पुणे विमानतळावरील प्रवाशाची संख्या मोठ्या प्रमाणात घटली होती. परंतु आता ती पूर्वपदावर येऊ लागली आहे. पुणे विमानतळावरून प्रवासी संख्येचा उच्चांक निर्माण झाला आहे. 2022 – 23 या आर्थिक वर्षात पुणे विमानतळावरून 80 लाख प्रवाशांनी प्रवास केला होता.
नवे टर्मिनल पूर्ण
पुण्यात भारतीय विमानतळ प्राधिकरणाकडून 5,00,000 चौरस फूटपेक्षा जास्त मोठ्या बिल्ट-अप क्षेत्रासह अत्याधुनिक नवीन टर्मिनल बांधण्यात आले. पुणे विमानतळावर नव्या टर्मिनच काम पूर्ण झाले आहे. नवे टर्मिनल सुरू झाल्यामुळे पुणे विमानतळावरून 1 कोटी 20 लाख प्रवासी प्रवास करु शकतील.
कसे आहे नवे टर्मिनल
नवीन एकात्मिक टर्मिनल इमारतमध्ये 10 पॅसेंजर बोर्डिंग ब्रिज, 72 चेक-इन काउंटर आणि इन-लाइन बॅगेज प्रणाली आहे. पुणे विमानतळाची ही इमारत आंतरराष्ट्रीय दर्जाची आहे. या इमारतीमध्ये फोर-स्टार GRIHA रेटिंगसह ऊर्जा-कार्यक्षमतेसह व्यवस्था पुरवण्यात येणार आहे. रिटेल आउटलेट्ससाठी 36000 चौरस फूट जागेची तरतूद प्रवाशांच्या अल्पोपहारासाठी म्हणजे प्रवाशांसाठी राखीव ठेवण्यात आली आहे. सध्याची इमारत आणि नवीन इमारतीमुळे एक भव्यदिव्य स्वरुप प्राप्त होणार आहे.