क्राईमताज्या बातम्यामहाराष्ट्र

दीड महिन्यापूर्वी लग्न झालेल्या तरुणाचा सासरवाडीत खून, पत्नीला अटक


पिपरी : अवघ्या एक ते दीड महिन्यापूर्वी लग्न झालेल्या तरुणाचा सासरवाडीत खून झाल्याची घटना रविवारी (दि. ४) उघड झाली होती. तीन ते चार जणांनी वार करून खून झाल्याचे सांगितले जात असताना या खून प्रकरणाला धक्कादायक वळण मिळाले आहे.
खून झालेल्या तरुणाच्या पत्नीनेच त्याचा खून केला असल्याची फिर्याद तरुणाच्या आईने रविवारी (दि.४) तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यात दिली.

त्यानुसार पोलिसांनी तरुणाच्या पत्नीला अटक केली आहे. खून झालेल्या तरुणाचे नाव सुरज राजेंद्र काळभोर (वय २९, रा. आकुर्डी) असे असून तर अटक केलेल्या त्याच्या पत्नीचे नाव अंकिता सुरज काळभोर (वय २४) असे आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा मुलगा सुरज आणि सून अंकिता हे रविवारी शिरगाव येथे साईबाबाच्या मंदिरात जाऊन येतो, असू सांगून गेले होते. अंकिता हिने मंदिरात दर्शन झाल्यानंतर सुरज याला आपल्या गहुंजे येथील शेतामध्ये घेवून गेली. तिथे तिने दगड आणि धारधार हत्याराने सुरज याच्या डोक्यात वार केला. तसेच गळ्यावर मारून खून केल्याचा संशय फिर्यादी यांना आहे.

सुरज हा मानसिक व शारिरीक छळ करत होता. वारंवार संशय घेत असल्याने अंकिताला या सगळ्या गोष्टींचा राग येत होता. त्या रागातून तिने प्लॅन करून हे पाऊल उचलल्याचे प्राथमिक तपासात पोलिसांना दिसून येत आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button