ताज्या बातम्या

सापडलं पैशांचं झाड? हलवताच कोसळल्या नोटा; VIDEO सोशल मीडियावर VIRAL


पैशांचा झाडाचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. जे हलवताच त्यावरून चक्क पैसे पडत आहेत.



व्हिडिओ पहा👇😎😎

https://www.instagram.com/reel/CvzpZPrI3F5/?igshid=OGY3MTU3OGY1Mw==

तसं आपल्याला भरपूर पैसा मिळावा, आपल्याकडे पैसा आकर्षित व्हावा म्हणून लोक मनी प्लँटसारखी झाडं लावतात. पण प्रत्यक्षात काही या झाडाला पैसे लागतात असं नाही. पण आता पैसे देणाऱ्या झाडाचा व्हिडीओ समोर आला आहे. जो पाहून सर्वजण थक्क झाले आहेत. आता हे पैशांचं झाड पाहण्यासाठी तुम्ही खूप उत्सुक असाल. पैशांचं झाड आहे कसं? त्यावरून कसे पैसे पडतात? ते आहे कुठे असे? कितीतरी प्रश्न तुमच्या मनात असतील. चला तर पाहुयात.

व्हिडीओत तुम्ही पाहू शकता रस्त्याशेजारी एक मोठं झाड आहे. या झाडासमोर एक व्यक्ती आहे. जी झाडाला किक मारते. त्यानंतर झाडावरून पैशांच्या नोटा कोसळतात. त्या नोटा ही व्यक्ती उचलते आणि पुन्हा झाडाला लाथ मारते. त्यानंतर आणखी नोटा पडतात. तिथं असलेल्या इतर व्यक्तीही ते पाहतात. सर्वांनाचा आश्चर्याचा धक्का बसतो. आता असे पैसे मिळत असतील तर ते कुणाला नको होतील.

झाडावरून मिळणारे पैसे पाहून तिथं असलेल्या एका तरुणाच्या मनातही लालसा निर्माण होते आणि तोसुद्धा त्या झाडाजवळ जातो. झाडाला तो दोन्ही हातांनी पूर्ण ताकद लावून हलवतो. झाड तसं काही हलत नाही, ना त्याच्यावरून पैसे पडत. उलट त्या झाडावरून त्या तरुणाच्या अंगावर पाणी पडतं.

एकंदर हा प्रँक व्हिडीओ आहे हे समजतं. असं पैशांचं झाड कुठेच नाही. झाडावर एक व्यक्ती बसली आहे. जी पहिली व्यक्ती झाडाला लाथ मारताच पैशांच्या नोटा खाली फेकते आणि दुसरी व्यक्ती झाड हाताने हलवताच तिच्यावर पाणी टाकते.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button