बीड रेल्वे स्थानकास लोकनेते स्व.गोपीनाथजी मुंडे साहेब यांचे नाव द्यावे – श्री. गणेश लांडे

बीड : अहिल्यानगर बीड परळी रेल्वे हे लोकनेते स्व. गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांचे स्वप्न होते . आज त्यांचे स्वप्न साकार होत आहे.

त्याचे सर्वस्वी योगदान लोकनेते स्व. मुंडे साहेबांचे आहे. मुंडे साहेबांच्या नंतर या रेल्वेमार्गासाठी पंकजाताई यांनी सातत्याने याचा पाठपुरावा करीत या रेल्वेमार्गासाठी केंद्र व राज्य सरकारकडून निधी उपलब्ध करून दिला. ही रेल्वे बीडची भाग्यदाईनी ठरणार आहे.
याचे श्रेय स्व. मुंडे साहेब त्यांच्या नंतर हा प्रकल्प नेटाने पुढे नेण्याचे श्रेय पंकजाताई व प्रीतमताई यांनाच द्यावे लागेल. त्यामुळेबीड रेल्वे स्थानकास लोकनेते स्व.गोपीनाथजी मुंडे साहेब* यांचे नाव द्यावे ही मागणी निवेदना द्वारे बीड जिल्हा भाजपाचे सरचिटणीस व बऱ्हाणपूरचे उपसरपंच श्री. गणेश लांडे यांनी केली आहे. या मागणीचा शासकीय पातळीवर पाठपुरावा व्हावा या मागणीसह त्यांनी हे निवेदन जिल्हाधिकारी बीड यांना दिले आहे.
यावेळी जिल्हा उपाध्यक्ष नवनाथ अण्णा शिराळे, सचिव शांतिनाथजी डोरले, प्रदेश उपाध्यक्ष अनिलजी चांदणे, दादासाहेब ननावरे,राजू शहाणे,चंदू मिसाळ व भारतीय जनता पार्टी सर्व पदाधीकारी इत्यादी उपस्थित होते











