आष्टीच्या शिबीरात खा.प्रितमताई मुंडे यांनी व्यक्त केली भावना
दिव्यांग तपासणी शिबिरातून वंचितांची सेवा करण्याची संधी मिळाली
————————
आष्टीच्या शिबीरात खा.प्रितमताई मुंडे यांनी व्यक्त केली भावना
———————-
आष्टी। दि.३० मे (प्रतिनिधी –गोरख मोरे ) : समाजातील वंचित-उपेक्षित घटकांना न्याय देण्यासाठी लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांनी सातत्याने काम केले आहे. त्यांच्या सुखदुःखात एकरूप होण्याचे संस्कार आम्हाला मुंडे साहेबांनी दिले आहेत.केंद्र सरकारच्या माध्यमातून आपल्या जिल्ह्यात दिव्यांग तपासणी शिबिर राबवताना आम्हाला वंचितांच्या सेवेची संधी मिळत आहे,ही बाब आमच्यासाठी आनंदाची आणि अभिमानाची असल्याची भावना खा. डॉ.प्रितमताई मुंडे यांनी आष्टी येथील दिव्यांग तपासणी शिबिराच्या उदघाटन प्रसंगी व्यक्त केली.ग्रामीण रुग्णालय आष्टी इथे काल केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालयाच्या माध्यमातून व गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांग पूर्व तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते.याप्रसंगी आ.सुरेश धस,मा. आ.भीमराव धोंडे,भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के, वाल्मिक निकाळजे,विजय गोल्हार,पल्लवी धोंडे,डॉ.शैलजा गर्जे,जयदत्त धस,साहेबराव मस्के
डॉ.राहुल टेकाळे,डॉ जयश्री शिंदे डॉ मोरे,डॉ जावळे,सिस्टर कर्मचारी,सुखदेव पोकळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.तसेच यावेळी ‘दिव्यांग’ पत्रकार आण्णासाहेब साबळे,अविशांत कुमकर,सचिन रानडे,प्रविण पोकळे आदी पत्रकार उपस्थित होते तसेच जिल्हा अध्यक्ष राजेंद्र लाड,प्रहार दिव्यांग शासकीय निमशासकीय व अधिकारी कर्मचारी संघटनेचे बीड जिल्हा अध्यक्ष सिद्धेश्वर शेंडगे तालुका अध्यक्ष देविदास भवर तालुका सचिव सुदर्शन घुले सर युवराज वायभासे,राजाभाऊ देशमुख,बद्रीनाथ भोसले,संगिता चितळे,श्रेया दिव्यांग विद्यालयातील कर्मचारी व बहुसंख्य दिव्यांग बांधव बघिनी तसेच सर्व क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.शिबिराच्या उदघाटन प्रसंगी उपस्थितांशी संवाद साधताना खा.प्रितमताई मुंडे म्हणाल्या की ‘दैनंदिन प्रवासादरम्यान दिव्यांग बांधवांना भेटण्याचे अनेक प्रसंग आले,याप्रसंगांमध्ये त्यांच्याप्रती हळहळ व्यक्त करण्यापलीकडे काहीतरी करावे,त्यांचे जीवन कष्टमुक्त होईल यासाठी योगदान द्यावे हा विचार सातत्याने मनात येत असे.म्हणून आम्ही हा पूर्व तपासणी शिबिराचा उपक्रम राबवित आहोत.आपल्या जिल्ह्यातील अधिकाधिक गरजू लोकांना या शिबिरातून सहाय्यक साधने उपलब्ध करून देण्याचा आमचा मानस आहे,या उपक्रमातून दिव्यांगांची सेवा करण्याची संधी मिळत आहे. समाजातील वंचित,उपेक्षितांच्या सुखदुःखात एकरूप होण्याचे संस्कार आम्हाला मुंडे साहेबानी दिले आहेत.या शिबिरातून वंचितांच्या सुखदुःखात एकरूप होत आहोत,प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे या योजनेसाठी आभार.त्यांनी दिव्यांग अशी ओळख दिल्याने समाजाचा दृष्टिकोन आणि धारणा बदलली असल्याचे खा.प्रितमताई मुंडे यांनी सांगितले.या कार्यक्रमाचे भारदार सुत्रसंचलन दिव्यांग कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र लाड सर यांनी केले व बीड भाजप सरचिटणीस शंकर देशमुख यांनी सर्वाचे आभार मानले