ताज्या बातम्यामहाराष्ट्र

प्लास्टिक टाक्यांचा तराफ्याने वाळू उपसा; वाळूचोरांची अनोखी शक्कल


जळगाव:दहिगाव (ता. पाचोरा) शिवारातील गिरणा नदी पात्रात प्लॅस्टिक टाक्यांचा तराफा तयार करून वाळू उपशा संदर्भात डोकलखेडा ( ता पाचोरा) ग्रामपंचायतीचे पदाधिकारी व महसूल विभागाने कार्यवाही केली असून प्लॅस्टिक टाक्या जप्त केल्या आहेत.
दहिगाव शिवारातील गिरणा नदी पात्रात प्लास्टिकच्या टाक्यांचा तराफा करून त्या आधारे वाळू उपसा व साठवणुकीसाठी करून वाहतूकदार वाळूची वाहतूक डोकलखेडा रस्त्यावरून करत होते.



त्यामुळे रस्त्यांची कमालीची दुर्दशा झाल्याने ग्रामपंचायतीकडे ग्रामस्थांकडून तक्रारी करण्यात आल्या.

त्या आधारे सरपंच योगेश पाटील, उपसरपंच सुनील पाटील, सदस्य महेंद्र पाटील, अनिल भिल यांच्यासह ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीची मासिक सभा आटोपून गिरणा नदीपात्र गाठले व वाळू उपसा करण्यासाठी वापरण्यात येणारी अनोखी शक्कल पाहून प्रांताधिकारी डॉ. विक्रम बांदल यांच्याकडे तक्रार करून योग्य ती कार्यवाही करण्याची मागणी सरपंच व सदस्यांनी केली.

त्या आधारे प्रांताधिकारी डॉ. बांदल यांनी मंडळ अधिकारी प्रशांत पगार, तलाठी नदीम शेख, दीपक दवंगे, आशिष काकडे, मयूर आगरकर यांना कार्यवाहीसाठी पाठवले. परंतु तोपर्यंत वाळू उपसा करणाऱ्यांना माहिती मिळाल्याने महसूल विभागाचे पथक येईपर्यंत गिरणा नदी काठावर बांधून ठेवलेले प्लास्टिक टाक्यांचे तराफे वाळू उपसा करणाऱ्यांनी पाण्यात सोडून दिले.

हे तराफे बाहेर काढण्यासाठी महसूल पथकाला स्थानिकांची मदत घ्यावी लागली. प्रचंड परिश्रम व प्रयत्नानंतर वाळू उपसा करण्यासाठी वापरले जाणारे प्लास्टिक टाक्यांचे तराफे नदीकाठावर आणण्यात आले.

प्लास्टिकच्या टाक्या महसूल पथकाने जप्त करून बांबू व लाकडी साहित्य नदीकाठीच जाळून नष्ट केले. तसेच वाळू वाहतूक होऊ नये, यासाठी जेसीबीच्या सहाय्याने नदीकाठी रस्त्यालगत मोठी चारी खोदण्यात आली आहे. या कारवाईमुळे वाळू उपसा व वाहतूक करणाऱ्याची पंचायत झाली आहे.

“”गेल्या काही दिवसांपासून माती व वाळू वाहतुकीमुळे रस्त्यांची प्रचंड दुरवस्था झाली. त्याबाबतच्या तक्रारी येत असल्याने पाहणी करण्यासाठी ग्रामपंचायत सदस्यांसह भेट दिली. महसूल विभागाच्या मदतीने योग्य ती कार्यवाही करण्यात आली आहे. पुढेही असा कोणताही प्रकार खपवून घेतला जाणार नाही.””


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button