पतीच्या मृत्यूनंतर 2 वर्षांनी पत्नीने कबर खोदून बाहेर काढला मृतदेह, हे वचन करायचं होतं पूर्ण
नवी दिल्ली : चर्चमध्ये घेतलेली शपथ पूर्ण करण्यासाठी एका महिलेनं आपल्या पतीचा कबरीतील मृतदेह बाहेर काढायला लावला. मृत पतीच्या अवशेषांसह केरळमधील तिच्या गावी जाण्याच्या आग्रह या महिलेचा होता. पती-पत्नी दोघेही सेंट अँथनी शाळेत शिक्षक होते. निवृत्तीनंतर पत्नी जॉलीने आपल्या पतीचा मृतदेह केरळला नेण्यासाठी न्यायदंडाधिकाऱ्यांकडे परवानगी मागितली. दोन वर्षांपूर्वी जॉलीच्या पतीचा कोरोनामध्ये मृत्यू झाला होता. शाळेजवळील स्मशानभूमीत त्यांची कबर खोदण्यात आली होती.
आता महिलेनं पतीची कबर पुन्हा खोदून घेतली आहे कारण तिला त्याचे अवशेष तिच्या मूळ गावी घेऊन जायचे आहेत. हे प्रकरण उत्तर प्रदेशातील फरुखाबादचं आहे. लग्नाच्या वेळी आयुष्यभर एकत्र राहण्याची शपथ घेणारे लोक तुम्हाला दिसतील, पण ही शपथ पाळणारे लोक जगात फार कमी आहेत. अशीच एक अनोखी घटना फतेहगडमधून समोर आली आहे, जिथे दोन वर्षांपूर्वी निधन झालेल्या पतीचा मृतदेह आपल्यासोबत ठेवण्यासाठी पत्नीने कबर खोदली आहे.
केरळची रहिवासी असलेली जॉली फरुखाबाद येथील सेंट अँथनी शाळेत शिक्षिका आहे. केरळहून फारुखाबादला आलेली जॉली आणि तिचा पती पॉल गेल्या अनेक वर्षांपासून शाळेत शिकवत होते. जॉलीचा पती पॉल यांचा दोन वर्षांपूर्वी कोरोनाच्या काळात मृत्यू झाला होता. कोरोनाच्या काळात देशव्यापी लॉकडाऊनमुळे तिला पतीचा मृतदेह केरळला नेता आला नाही, त्यामुळे फतेहगढ येथील ख्रिश्चन स्मशानभूमीत मृतदेह पुरण्यात आला.
पतीच्या मृतदेहाचे अवशेष बाहेर काढून ते केरळला नेण्यासाठी जॉलीने जिल्हाधिकाऱ्यांकडे परवानगी मागितली होती. जिल्हाधिकाऱ्यांकडून परवानगी मिळाल्यानंतर प्रशासनाने कबर खोदून जॉली यांच्या पतीचे अवशेष त्यांच्या ताब्यात दिले आहेत. दिवंगत पॉल यांच्या पत्नी जॉली यांनी सांगितलं की, त्यांच्या पतीचे दोन वर्षांपूर्वी निधन झाले होते, त्यांचा मृतदेह इथे पुरण्यात आला होता. जॉली ही केरळची रहिवासी असून तिने आपल्या पतीचे अवशेष आपल्यासोबत केरळला नेण्यासाठी अर्ज केला होता, त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांकडून परवानगी मिळाल्यानंतर कबर खोदून पतीचे अवशेष त्यांच्या ताब्यात देण्यात आले.