शिर्डी येथील रिपाइंच्या अधिवेशनास रिपब्लिकन श्रमिक ब्रिगेडचे हजारो कार्यकर्ते उपस्थित राहणार – डॉ. सतिश केदारी,
शिर्डी येथील रिपाइंच्या अधिवेशनास रिपब्लिकन श्रमिक ब्रिगेडचे हजारो कार्यकर्ते उपस्थित राहणार – डॉ. सतिश केदारी,
पुणे : रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या आदेशानुसार शिर्डी येथे रविवार दि. २८ / ५ / २०२३ रोजी होणाऱ्या रिपब्लिकन पक्षाच्या राज्यस्तरीय अधिवेशनास रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले संलग्न रिपब्लिकन श्रमिक ब्रिगेडचे राज्यभरातील हजारो कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत , अशी माहिती रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले संलग्न रिपब्लिकन श्रमिक ब्रिगेडचे प्रदेश अध्यक्ष डॉ सतिश केदारी यांनी पुणे येथील संघटनेच्या बैठकीत बोलताना दिली,
शिर्डी येथील रिपाइंच्या राज्यस्तरीय अधिवेशनास जाण्याबाबत रिपब्लिकन श्रमिक ब्रिगेडची महत्वपूर्ण बैठक डॉ. सतिश केदारी यांच्या अध्यक्षतेखाली शनिवार दि. २० / ५ / २०२३ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन मालधक्का पुणे येथे दुपारी १२ – ०० वाजता संपन्न झाली . सदर बैठकीत बोलताना डॉ. सतिश केदारी म्हणाले , रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री लोकनेते नामदार रामदासजी आठवले यांच्या आदेशानुसार, शिर्डी येथील पक्षाचे राज्यस्तरीय अधिवेशन हे गर्दीचा उच्चांक करणारे अधिवेशन ठरणार आहे. त्यामुळे आठवले यांचे कडवे सैनिक म्हणून हे अधिवेशन यशस्वी करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. शिर्डी येथील अधिवेशनात रिपब्लिकन श्रमिक ब्रिगेडचे राज्यभरातुन हजारो कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत, पुणे जिल्ह्यातुनही या अधिवेशनास मोठ्या संख्येने रिपब्लिकन श्रमिक ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी जाणे आवश्यक आहे. सर्व पदाधिकारी यांना अधिवेशनास उपस्थित राहणे बंधनकारक आहे, त्यामुळे आपापल्या भागातुन कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने अधिवेशनास उपस्थित राहावे असे आवाहनही डॉ सतिश केदारी यांनी केले,
यावेळी रिपब्लिकन श्रमिक ब्रिगेडचे प्रदेश सरचिटणीस संदीपान साबळे, प्रदेश उपाध्यक्ष कुमारदादा ढवळे, प्रदेश कार्याध्यक्ष विष्णूदादा भोसले, प्रदेश सचिव कल्याण आढाळगे पीएमपीएम एल कामगार संघटनेचे अध्यक्ष नानासाहेब सोनवणे,, प. महाराष्ट्र सचिव स्टीवन जोसेफ, प्रदेश संघटक सचिव शकुरभाई शेख, प. महाराष्ट्र उपाध्यक्ष सत्तारभाई शेख, प. महाराष्ट्र उपाध्यक्ष मंगेश सोनवणे, पुणे शहर अध्यक्ष सुरज गायकवाड, पुरुषोत्तम पवार , अध्यक्ष पारधी आघाडी, बळीराम सोनवणे प्रकाश कदम, सुभाष सहजराव सचिव पुणे जिल्हा, राहुल वाघवले ,दशरथ वाघमारे ,संजू वाघमारे, काळूराम गाडे, कांता गाडे, रमाकांत रणदिवे , भारत आढाळगे, यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते,
यावेळी कल्याण आढागळे यांनी रिपब्लिकन श्रमिक ब्रिगेड मध्ये प्रवेश केल्याबद्दल , व पुणे शहर अध्यक्ष सुरज गायकवाड हे प्रभावीपणे काम करीत असल्यामुळे, रिपब्लिकन श्रमिक ब्रिगेडचे प्रदेश अध्यक्ष डॉ सतिश केदारी व प्रदेश उपाध्यक्ष कुमार ढवळे यांच्या हस्ते या दोघांचा सत्कार करण्यात आला,
यावेळी रिपब्लिकन श्रमिक ब्रिगेडच्या मिटींग व कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी , व सर्व पदाधिकारी यांना फोन करण्याची जबाबदारी निश्चित करण्यात आली, पुणे शहर अध्यक्ष सुरज गायकवाड, प . महाराष्ट्र सचिव स्टीवन जोसेफ व प्रकाश कदम , हे या पुढे मिटींग व इतर कार्यक्रमाची माहितीसाठी सर्वांना फोन करतील या बाबत ठराव करण्यात आला,
प्रदेश सरचिटणीस संदिपान साबळे, प्रदेश उपाध्यक्ष कुमार ढवळे, प्रदेश कार्याध्यक्ष विष्णूदादा भोसले यांनी, मिटींगला संबोधित करुन पदाधिकारी यांनी शिर्डी येथील राज्यस्तरीय अधिवेशनास मोठ्या संख्येने उपस्थित राहाण्याचे आवाहन केले, तर सुरज गायकवाड यांनी उपस्थितांचे आभार मानले,