या जिल्ह्यात शेतकर्यांना 318 कोटी रुपयांचे पीक कर्जाचे वाटप
धुळे:निसर्गाच्या लहरीपणामुळे गेल्या वर्षात खरीप हंगामातील पिकासोबत रब्बी हंगामातील पिकांचे देखील मोठे नुकसान झाले आहे, यामध्ये शेतकऱ्याचा लागलेला खर्चही निघालेला नाही, मात्र तरी देखील शेतकरी या सर्व संकटावर मात करत पुन्हा एकदा खरीप हंगामाच्या शेती मशागतीला लागला आहे. खते, बी-बियाणे यासाठी शेतकरी आता पीक कर्जाकडे वळाले आहेत. बुलढाणा जिल्ह्यात खरीप हंगामासाठी आतापर्यंत 318 कोटी रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्यात आले आहे.
30 हजार 109 शेतकऱ्यांना 318 कोटी रुपयांचे वाटप
बुलढाणा जिल्ह्यात यावर्षी खरीप हंगामासाठी 1 लाख 53 हजार शेतकऱ्यांना 1470 कोटी रुपयाचे उद्दिष्ट मिळाले असून, आतापर्यंत 30 हजार 109 शेतकऱ्यांना 318 कोटी रुपयांचे वाटप झाले आहे. तर ज्या शेतकऱ्यांनी चालू वर्षात किंवा मागील वर्षात कर्ज घेतली असेल आणि त्यांनी नूतनीकरण जर केले, तर अशा शेतकऱ्यांना राज्य शासनाकडून चार टक्के आणि केंद्र शासनाकडून तीन टक्के व्याज शंभर टक्के माफ होते. त्यामुळे शेतकऱ्यांना व्याजाचा दर हा शून्य टक्के लागतो. शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन अग्रणी बँकेकडून करण्यात आले आहे.