खोदकाम करताना सापडली खातू श्यामची मूर्ती, दर्शनासाठी भाविकांची झुंबड
मुरादाबाद: मुरादाबादच्या मुंडापांडे भागातील एका शेतात खोदकाम करत असताना खातू श्यामची मूर्ती सापडली आहे. त्याच ठिकाणी गावकऱ्यांनी मूर्तीची प्रतिष्ठापना केली असून या मूर्तीला पाहण्यासाठी आसपासच्या गावातून अनेक भाविक गर्दी करीत आहेत.
मुंडापांडे परिसरातील हिरणखेडा गावात ही घटना आहे. गावातील पंडितजींच्या शेताच्या बाजूला बांधलेल्या समाधीच्या देखभालीसाठी खोदण्यात येत असलेल्या खड्ड्यात ही मूर्ती सापडली आहे. उत्खनना दरम्यान सापडलेल्या या मूर्तीने सध्या सर्वांचेच लक्ष वेधून घेतले असून ही बातमी समजतात घटनास्थळी नागरिकांची गर्दी होऊ लागली. मूर्ती सापडलेल्या जागेवर मूर्तीची प्रतिष्ठापना केल्यानंतर लगेचच महिलांनी पूजा करण्यास सुरुवात केली.
खातू श्याम यांच्यावर श्रद्धा असलेलया भाविकांची येथे गर्दी जमत आहे. 16 वर्षे जुन्या समाधीच्या देखभालीसाठी गावातील पंडित जींच्या शेतात खोदकाम करणाऱ्या प्रदीप यांनी सांगितले की, “खोदकाम करत असताना त्यांची कुदळ एका वस्तूवर आदळला, तेव्हा ती वस्तू नेमकी कोणती आहे हे पाहण्यासाठी तिला बाहेर काढले तेव्हा ती खाटू श्यामजींची मूर्ती असल्याचे समोर आले. त्यानंतर प्रदीप यांनी जमिनीचे मालक पंडितजींना याची माहिती दिली. त्यानंतर याठिकाणी खातू श्यामजींच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली.
खाटू श्यामजी कोण आहेत? खाटू श्यामजी यांना भगवान कृष्णाचे कलियुगातील अवतार म्हंटले जाते. महाभारतात भीमाचा मुलगा घटोत्कच आणि घटोत्कचाचा मुलगा बर्बरिक होता. बर्बरिक यांना बाबा खाटू श्याम म्हणतात. त्याच्या आजीचे नाव हिडिंबा होते.