ताज्या बातम्या

जागतिक परिचारिका दिन उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे उत्साहात साजरा 


जागतिक परिचारिका दिन उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे उत्साहात साजरा 

चंद्रपूर : जागतिक परिचारिका दिनाला मा.डाॅ महादेवराव चिंचोळे जिल्हा शल्य चिकित्सक चंद्रपूर,मा .डॉ हेमचंद कन्नाके निवासि वैद्यकीय अधिकारी जिल्हा चंद्रपूर, यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला .
मा . डॉ चिंचोळे जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.सोबत मंचावर डॉ हेमचंद कन्नाके निवासि वैद्यकीय अधिकारी, मा .श्री सूभाष दांदळे साहेब खासदार, आमदार प्रतीनिधी वरोरा,मा .डॉ अंकुश राठोड वैद्यकीय अधीक्षक, मा.डॉ सींग वैद्यकीय अधीक्षक,मूल ,मा. डॉ .पराग,मा. डॉ लोणारे इत्यादी मान्यवरांनी दिपप्रज्वलन करून फ्लाॅरेंन्स नाईटिंगेल यांच्या प्रतिमेचे पूजन करून सर्व परीचारीका भगीनींना शुभेच्छा दिल्या . महिला भगीनि ईनर व्हिलच्या अध्यक्ष मा. निलिमा गूंडावार आणि सौ आदिती गुंडावार माजी सदस्य ईनर व्हिल सौ वंदना विनोद बरडे अधीसेविका उपजिल्हा रुग्णालय वरोरा जिल्हा चंद्रपूर यांनी फ्लाॅरेंन्स नाईटिंगेल यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पन करून सर्व परीचारिका भगीनिंना जागतिक आंतरराष्ट्रीय परीचारीका दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.सौ वंदना विनोद बरडे अधीसेविका यांनी सर्व परिचारिका भगिनींना गुलाबाचे फुल देऊन मेनबत्ती लावुन लाम्प लाईटनिंग करून मेणबत्तीप्रमाने आपणं सर्वांना प्रकाशीत करून गुलाबाप्रमाणे फुलुन हसत खेळत काटेरी वातावरणातून जावुन आरोग्यादाही वातावरण बनवून आरोग्य सेवा द्यावी हे समजावून सांगितले.तसेच सर्व परीचारीका यांच्यावतीने सौ वंदना विनोद बरडे अधीसेविका यांनी केक कापून फ्लाॅरेंन्स नाईटिंगेल यांच्या 293 वा वाढदिवस साजरा करण्यात आला.मा . डॉ महादेवराव चिंचोळे जिल्हा शल्य चिकित्सक, डॉ हेमंचद कन्नाके निवासि वैद्यकीय अधीकारी , डॉ अंकुश राठोड वैद्यकीय अधीक्षक यांनी परीचारीका भगीनींना केक चारून शुभेच्छा दिल्या.
हा कार्यक्रम एक सप्त्ताह घेण्यात आला . आणि या सप्ताहात मध्ये विविध उपक्रम सौ वंदना विनोद बरडे अधीसेविका यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आले यामध्ये सर्वच परीसेविका अधिपरीचारीका यांनि उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला.
दिनांक ६ मे २०२३ ला या कार्यक्रमाची सुरुवात झाली.मा डॉ अंकुश राठोड वैद्यकीय अधीक्षक डॉ अध्यक्षतेखाली व सौ वंदना विनोद बरडे अधीसेविका यांच्या उपस्थितीत सर्वंच परीसेवीका,अधिपरीचारीका अधिकारी कर्मचारी यांच्या उपस्थित फ्लाॅरेंन्स नाईटिंगेल यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पन करून परिचारिका सप्ताहाच्या शूभेच्छा देण्यात आल्या आणि सप्ताहाभर चालणार्या कार्यक्रमाची माहीती देण्यात आली.
दिनांक ७ मे ला स्तनदा मातांना आरोग्य योजनेची माहिती व देखभाल याविषयी माहिती देण्यात आली.
दिनांक ८ मे 2023 ला प्रश्न मंजुषा स्पर्धा घेण्यात आली याचे परीक्षण सौ सोनाली राईसपायले यांनी केले..
दिनांक ९ मे ला स्पिच स्पर्धा घेण्यात आली याचे परीक्षण सौ सिमा लाहोटी माजी अध्यक्ष ईनरव्हील क्लब वरोरा व तालुका विधी सेवा समिती सदस्य वरोरा
यांनी केले..
दिनांक 10 ला रांगोळी स्पर्धा घेण्यात आली .याचे परिक्षण सौ अपेक्षा पामपत्तिवार व सौ निलिमा गूंडावार माजी अध्यक्ष ईनरव्हील क्लब वरोरा यांनी केले.
दिंनाक 11ला फाॅशन शो घेण्यात आला .याचे परीक्षण सौ सिमा लाहोटी माजी अध्यक्ष ईनरव्हील क्लब वरोरा व सौ अपेक्षा पामपत्तिवार यांनी केले.
आणि 12 तारखेला रेसिपी कानटेस्ट घेण्यात आला याचे परीक्षण सौ. निलिमा गूंडावार व सौ आदीती गुंडावार यांनी केले.

परीचारिका यांच्या जिवनात बाकी स्पर्धा नेहमीच्या असतात पण त्यांच्या साठी खास स्पर्धा होती ती म्हणजे फाॅशन शो यांमध्ये 10 स्पर्धक होत्या.याचे परिक्षण सौ अपेक्षा पानपत्तिवार माजी अध्यक्ष ईनरव्हील क्लब वरोरा व सौ सिमा लाहोटी माजी अध्यक्ष ईनरव्हील क्लब वरोरा यांनी केले आणि नेहमीच्या शोचे प्रश्न परीचारिका भगीनिंना विचारण्यात आले आणि त्यापैकी 3 नंबर काढलें गेले आणि एक कौन्सेलेशन प्राईज काढण्यात आले.प्रथम क्रमांक सौ स्नेहा वंजारे ए. एन. एम. शिष्टर, दुसरा क्रमांक सौ वंदना विनोद बरडे अधीसेविका, तिसरा क्रमांक रुबिना खान व कौन्सलेशन सौ रत्नमाला ढोले ए.एन.एम शिष्टर यांना देण्यात आले.सर्व सहभागींना मा . डॉ महादेवराव चिंचोळे जिल्हा शल्य चिकित्सक, डॉ हेमंचद कन्नाके निवासि वैद्यकीय अधिकारी, डॉ अंकुश राठोड वैद्यकीय अधीक्षक यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.या कार्यक्रमासाठी सर्व परीसेविका अधिपरिचारिका कक्षसेवक सफाईदार यांनी मेहनत घेतली.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button