जयंत पाटील यांच्या ईडी नोटीसीवर शरद पवारांची प्रतिक्रिया
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना ईडीने नोटीस बजावली आहे. आयएल आणि एफएस या प्रकरणात जयंत पाटील यांना ही नोटीस बजावण्यात आली आहे. दरम्यान, यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
शरद पवार म्हणाले की, नवाब मलिकांवर जी कारवाई केली, त्यांच्यावर जो प्रचंड अन्याय केला. या अन्यायाच्या पाठिमागे जी प्रवृत्ती होती, त्याबद्दल नवाब मलिकांनी पत्रकार परिषद घेऊन जाहीर केलं होतं. त्यावर अत्याचार केला. या सगळ्या गोष्टीचं फळ कालच्या साबीआयच्या छापेमारी संबंधितांना सहन करावं लागतंय.
सीबीआयच्या कारवाईबद्दल आताच काही सांगता येत नाही. सुरूवात तर ठीक दिसतेय. पण यामागे आणखी काय असेल? सांगता येत नाही. कारण सीबीआय आणि ईडीने आमच्या अनेक सहकाऱ्यांना नोटीस धाडल्या आहेत. आमच्या प्रदेाध्यक्षांनाही अलीकडे नोटीस पाठवली. त्याबद्दल कधी कुणी चर्चाही केली नव्हती, तरीही त्यांना नोटीस आली. याचा अर्थ ही सगळी आयुधं विरोधतांना थांबवण्यासाठी वापरली जातात, असं प्रथमदर्शनी दिसतंय, असं शरद पवार म्हणाले.