पिंपरी-चिंचवड पालिकेत विविध पदांवरील 58 जणांना पदोन्नती
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेतील विविध विभागातील विविध पदांवरील अधिकारी, कर्मचार्यांच्या बढतीचा निर्णय घेण्यात आला. यामध्ये एकूण 58 जणांना विविध पदांवर पदोन्नती देण्यात आली आहे.महापालिकेचा रखडलेला आकृतीबंध, भरती प्रक्रिया, पदोन्नती, निवृत्त होणार्या अधिकारी व कर्मचार्यांमुळे शेकडो पदे रिक्त आहेत. पदोन्नती समितीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत विविध पदांवर पदोन्नती देण्याचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले. त्यानुसार एकूण 58 अधिकारी, कर्मचार्यांनी पदोन्नती देण्याचे आदेश सामान्य प्रशासन विभागाने काढले आहेत.
यामध्ये लेखापाल पदावर 6, उपलेखापाल 17, लिपिक 1, उद्यान अधिक्षक 9, आरेखक 2, विद्युत पर्यवेक्षक 10, मुख्य आरोग्य निरीक्षक 2, कार्यकारी अभियंता (विद्यूत) 4, उपअभियंता (स्थापत्य) 4, मेट्रन 1 आणि सहायक मेट्रन 1 अशा एकूण 58 जणांना पदोन्नती देण्यात आली. पदोन्नती झालेल्या अधिकार्यांना संबधित विभागात व नेमून दिलेल्या पदावर रूजू होण्याचे आदेश सामान्य प्रशासन विभागाने दिले आहे. तर, पदोन्नतीमुळे रिक्त झालेल्या पदांवर भरती प्रक्रियेनंतर कर्मचारी उपलब्ध होणार आहेत.