ताज्या बातम्यामहाराष्ट्र

तरुणीची छेड काढून जीवे मारण्याची धमकी देणारा गजाआड


पुणे:तरुणीची छेड काढून तिला जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या एकास गुन्हे शाखेने पकडले. सोहेल सलीम मुल्ला (वय २२, रा. विमाननगर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. सोहेल एका तरुणीचा पाठलाग करून तिला त्रास देत होता. तरुणीने त्याला जाब विचारल्यानंतर तिला जीवे मारण्याची धमकी देऊन सोहेल पसार झाला होता.



तरुणीने याबाबत समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाकडून सोहेलचा शोध घेण्यात येत होता. तो सोमवार पेठेत मित्राला भेटण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलीस कर्मचारी निलेश साबळे आणि इम्रान शेख यांना मिळाली. पोलिसांच्या पथकाने सापळा लावून त्याला पकडले.

सहायक पोलीस आयुक्त सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील, शब्बीर सय्यद, सहायक निरीक्षक आशिष कवठेकर, अमोल पवार, अयाज दड्डीकर, अण्णा माने आदींनी ही कारवाई केली.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button