पुण्यातून धावली दुसरी भारत गौरव रेल्वे
पुणे: पुण्यातून गुरुवारी सकाळी भारत गौरवची दुसरी गाडी रवाना झाली. यावेळी रेल्वे आणि आयआरसीटीसीच्या अधिकाऱ्यांनी गाडीचे पूजन करून हिरवा झेंडा दाखवला देशभरातून भारत गौरव रेल्वेच्या सुमारे 350 पेक्षा अधिक फेऱ्या होणार आहेत. यातील पुण्यातून या रेल्वेच्या फेऱ्या सुरू झाल्या आहेत त्यातीलच दुसरी गाडी गुरुवारी सकाळी साडे नऊच्या सुमारास रवाना झाली. ‘
महाकालेश्वर संग उत्तर भारत देवभूमी यात्रा’असे या गाडीचे नाव आहे. यावेळी रेल्वेच्या अधिकाऱ्यांसह आयआरसीटीसीचे अतिरिक्त महाव्यवस्थापक हर्षवर्धन रावत, मुंबई येथील टूरिझम मॅनेजर रविकांत जंगले, रेल्वे प्रवासी ग्रुपच्या अध्यक्षा हर्षा शहा व अन्य उपस्थित होते. ही गाडी पुण्यातून सुटल्यावर दहा रात्री, अकरा दिवस उजैन, आग्रा, मथुरा, हरिद्वार, रिषिकेश, अमृतसर, वैष्णोदेवी आणि पुन्हा पुणे असा प्रवास करेल.