क्राईमताज्या बातम्यामहाराष्ट्र

विवाहित महिलेचा लॉजवर खून, एका संशयितास अटक


आटपाडी : आटपाडीतील एका लॉजवर २७ वर्षीय महिलेचा खून झाल्याची घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली. छाया मधुकर देवडकर (रा. विठ्ठलनगर आटपाडी) असे मृत विवाहित महिलेचे नाव आहे.

याबाबत एका संशयितास आटपाडी पोलिसांनी अटक केली आहे.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, आटपाडी बाजार समितीच्या समोर एका लॉजमध्ये गुरुवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास छाया मधुकर देवडकर व संशयिताने खोली बुक करून राहिले होते. दरम्यान, गेल्या दोन दिवसांपासून हॉटेलमधील कर्मचाऱ्यांनी दरवाजा उघडून पाहिला नाही.

शनिवारी सकाळी खोलीतून दुर्गंधी येऊ लागल्याने पोलिसांना पाचारण करण्यात आले. यावेळी खोलीचा दरवाजा उघडून पाहिला असता छाया देवडकर हिचा मृतदेह आढळून आला. दरम्यान, लॉजच्या नोंदणीनुसार खोली बुक केलेल्या संशयितास आटपाडी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अधिक तपास पोलिस करीत आहेत.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button