शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी बातमी; मान्सूनबाबत मोठी अपडेट
नागपूर: राज्यात होत असलेल्या अवकाळी पावसामुळे मान्सूनवर परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. हीच स्थिती आणखी काही दिवस कायम राहिल्यास पर्जन्यमानावर परिणाम होण्याची शक्यता आहे.
मे महिन्यात कडाक्याच्या उन्हाने त्रस्त असणाऱ्या नागरिकांना यंदा मात्र गारेगार वातावरण अनुभवता येत आहे. एप्रिल आणि आता मे महिन्याच्या सुरुवातीला देखील राज्याच्या अनेक भागात पाऊस सुरू असून, या अवकाळी पावसाचा विपरीत परिणाम पर्जन्यमानावर होण्याची भीती हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. खरीप हंगामात पावसात खंड पडल्यास बळीराजा अडचणीत येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
मान्सूनला विलंब झाल्यास पिकांना फटका यंदा हवामान विभागाने जेमतेम पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे.
त्यातही उन्हाळ्यात कडक ऊन पडलं नाही तर त्याचा विपरीत परिणाम मान्सूनच्या वाटचालीवर होऊ शकतो. परिणामी मान्सूनला विलंब झाल्यास त्याचा पेरणीवर आणि पिकांवर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येणार नाही असं हवामान अभ्यासक सुरेश चोपणे यांनी म्हटलं आहे. 3 दिवस महत्वाचे! हवामान खात्याने दिला इशारा, अशी घ्या पिकांची काळजीग्लोबल वॉर्मिगमुळे पिकांना फटका ग्लोबल वॉर्मिगमुळे निसर्गाचं चक्र असंतुलीत होत आहे. यंदा सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. त्यातच आता एप्रिल आणि मे महिन्यात अवकाळी पाऊस हजेरी लावत असल्यानं या पावसाचा गंभीर परिणाम हा मान्सूनवर होऊ शकतो अशी भीती हवामान तज्ज्ञांकडून वर्तवण्यात आली आहे.